10 20 30 pay fixation
वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन मार्च 2019 नुसार सातव्या वेतन आयोगा मध्ये तीन लाभच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ह्या दहा, वीस, तीस वर्ष यांची सेवा पूर्ण झाली त्यांना 1 जानेवारी 2016 पासून ही योजना अमलात आलेली आहे.
त्यामुळे ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बारा वर्षाचा लाभ किंवा चोवीस वर्षांचा लाभ हा त्यांना 1 जानेवारी 2016 पूर्वी जर मिळाला असेल तर बारा वर्षापासून आठ वर्ष व चोवीस वर्षापासून सहा वर्ष पकडून पुढे येणारी वीस वर्ष किंवा तीस वर्ष नंतरची आश्वासित प्रगती योजना द्यावयाची आहे.
परंतु ज्यांना 1 जानेवारी 2016 नंतर बारा वर्षाचा किंवा चोवीस वर्षाचा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला असेल, तर त्यांची ती 12 वर्षे 24 वर्षाची आश्वासित प्रगती योजना रद्द करून त्यांना 10, 20 वर्षाची आश्वासित प्रगती योजना मंजूर करायची आहे.
वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक वेतन 1119/प्रक्र 3/सेवा 3/2019/ दिनांक 02 मार्च 2019 चे शासन निर्णयामधील परिच्छेद (viii) नुसार दिनांक 01-01-2016 ते सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत सेवांतर्गत प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबतचे आदेश, निर्गमित होण्याच्या तारखेपर्यंत ज्यांना शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 01-04-2010 नुसार सुधारीत संवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा यथास्थिती पहलिा वा दुसरा लाभ मंजूर करण्यात आला आहे. अशा कर्मचारी / अधिकारी यांचे असुधारीत लाभाचे, यापूर्वीचे आदेश रद्द करून त्यांना तीन लाभाच्या योजनेनुसार सातव्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रीक्सनुसार, पदोन्नतीच्या पदाच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीत, सदर लाभ सुधारीतरित्या मंजूर करण्यात येतील असे निर्देशीत केले आहे.
त्यामुळे त्यांना आश्वासीत योजनेचा लाभ हा दहा वर्षे किंवा वीस वर्ष ची सेवा ही एक जानेवारी 2016 पूर्वी होत असेल तरी 1 जानेवारी 2016 ला झाली असे समजून तेव्हा त्यांचे दहा वर्ष वीस वर्ष किंवा तीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना वेतन निश्चिती ही 1 जानेवारी 2016 ला करावी व पुढील येणारी वेतन निश्चिती ही 1 जानेवारी 2026 राहील.
ज्यांची दहा वर्ष वीस वर्ष किंवा तीस वर्ष सेवा ही 2 जानेवारी किंवा त्यानंतर होत असेल अशांनी जुलै चा विकल्प फायदा होत असल्यास द्यावा.
Excel Sheet for pay fixation of 10 20 30 from 1.1.2016 revised
01 जानेवारी, 2016 पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या दि.01 जानेवारी, 2016 रोजीच्या वेतननिश्चितीबाबत………. |
महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 – अधिसूचना |
महाराष्ट्र नागरी सेवा (सु.वे.) नियम, २०१९ च्या अनुसूचीत सुधारणा करणेबाबत – विविध विभाग |
महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण.