31 जुन रोजी जे सेवानिवृत्त झाले त्यांना १ जुलैचे वेतनवाढ तसेच 31 डिसेंबर रोजी जे सेवानिवृत्त झाले त्यांना १ जानेवारीची वेतनवाढ मिळण्याबाबत
वित्त विभाग, शासन परिपत्रक दिनांक 28 जून 2023 नुसार जे कर्मचारी 30 जून ला सेवानिवृत्त झालेले आहे व अशा कर्मचाऱ्यांना जर यापुर्वीं जुलै ची वेतनवाढ मिळतअसेल तर अशा कर्मचाऱ्यांना त्यांची सतत बारा महीन्याची अर्हताकरी सेवा होत असेल किंवा सेवा केली आहे अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै रोजी चे काल्पनिक नोटेशनल वेतनवाढ देण्यात येईल.
तसेच जे कर्मचारी 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले आहे व ज्यांची मागील बारा महिन्याची अर्हताकारी सेवा झालेली आहे अशांना 1 जानेवारी चे काल्पनिक नोटेशनल वेतनवाढ मिळेल.
तर या करता काय पहावे लागेल प्रथम त्या कर्मचाऱ्याला एक जुलै ते 30 जून किंवा एक जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची वेतनवाढ / आश्वासित प्रगती योजना / पदोन्नती जर मिळाली असेल तर त्यांना हा लाभ मिळत नाही व ज्यांना यापैकी काहीच मिळाला नसेल म्हणजे बारा महिने कोणत्याही प्रकारची वेतनामध्ये वाढ झाली नसेल तर अशांना जानेवारी किंवा जुलैला देय असणारी वेतनवाढ मिळेल.
याकरिता ज्यांची वेतनवाढ जानेवारीला आता जानेवारीचे तुम्हाला कोणाची राहील का जे 1 जानेवारी 2016 नंतर लागलेले आहे आणि ज्यांची रुजू दिनांक जानेवारी ते जून या दरम्यानची असेल असेच कर्मचारी किंवा ज्यांना जानेवारी ते जून या दरम्यान जर पदोन्नती किंवा आश्वासित प्रगती मिळाली असेल असेच कर्मचारी हे डिसेंबर ची जी वेतनवाढ आहे ती भेटण्यास पात्र राहील. व अशांचीच वेतनवाढ ही जानेवारी राहील. 2016 पुर्वी बहूतांशाना जुलैची वेतनवाढ असेल जर त्यांना आश्वासित किंवा पदोन्नती मीळाली असेल व ती जर २ वेतनवाढीपेक्षा जास्त उंचावली नसेल तर त्यांची जुलै ही वेतनवाढ राहील ती बदलणार नाही.
28_06_2023_30_जून_रोजी_से नि_सेवानिवृत्त_कर्मचा_यांना_1_जुलैची_वेतनवाढ