Let’s introduce the tabs in the new Sevaarth system so that filling in the information becomes convenient
Table of Contents
खालील माहीती बारकाईने तपासा व खात्री करा मगच डाटा लॉक करावा
१. Personal Details (वैयक्तिक माहिती)
-
कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव: सेवापुस्तिकेनुसार नाव, वडिलांचे/पतीचे नाव आणि आडनाव.
-
ओळख तपशील: जन्मतारीख, लिंग, वैवाहिक स्थिती, आधार क्रमांक, पॅन (PAN) नंबर आणि ई-मेल आयडी.
-
सामाजिक माहिती: जात संवर्ग (Category), धर्म व दिव्यांगत्व असल्यास त्याचा प्रकार.
२. Service / Office Details (सेवा आणि पद तपशील)
-
नियुक्तीचा तपशील: सेवेत रुजू झाल्याची तारीख (Date of Joining), नियुक्तीचा प्रकार (Regular/Contractual/Deputation).
-
पद व विभाग: कार्यरत पद (Designation), कार्यालय, विभाग आणि सेवा संवर्ग (Class 1/2/3/4).
-
सेवानिवृत्ती: जन्मतारीख आणि नियमांनुसार आपोआप येणारी सेवानिवृत्तीची तारीख (Date of Retirement).
३. Pay & Scales (वेतन आयोग व पे-मॅट्रिक्स तपशील)
-
वेतन आयोग: लागू असणारा वेतन आयोग (उदा. 7th Pay Commission).
-
पे मॅट्रिक्स: Pay Band / Level, चालू मूळ वेतन (Basic Pay) आणि पुढील वेतनवाढीची तारीख (Increment Date).
४. Allowances & Deductions (भत्ते आणि कपाती)
-
Allowances (भत्ते): महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वाहतूक भत्ता (TA) व इतर लागू असणारे विशेष भत्ते.
-
Deductions (कपाती): GPF / DCPS / NPS वर्गणी, गट विमा योजना (GIS), व्यवसाय कर (Profession Tax – PT), आयकर (Income Tax) आणि इतर कपाती.
५. Bank Details (बँक खात्याचा तपशील)
-
खात्याची अचूक माहिती: बँकेचे नाव, शाखा, कर्मचाऱ्याचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड (पगार थेट खात्यावर जमा होण्यासाठी अचूक भरणे आवश्यक).
६. Loans & Advances (कर्ज व अग्रिम तपशील)
-
शासकीय अग्रिम: घरबांधणी कर्ज (HBA), वाहन अग्रिम, संगणक अग्रिम किंवा इतर शासकीय कर्जाचा तपशील, मासिक हप्ता आणि एकूण शिल्लक हप्ते.
७. Nominee Details (वारसदार / नामनिर्देशन)
-
वारसदाराचा तपशील: वारसदाराचे नाव, कर्मचाऱ्याशी असलेले नाते, जन्मतारीख आणि वाटपाची टक्केवारी (Share %).
८. Photo / Document Upload (कागदपत्रे व फोटो)
-
अपलोड विभाग: कर्मचाऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो, सही आणि आवश्यक असल्यास सेवा प्रवेशाचे/ओळखीचे दस्तऐवज अपलोड करणे.
माहिती भरताना घ्यावयाची काळजी:
-
प्रत्येक टॅब भरल्यानंतर Save / Draft बटण दाबा, जेणेकरून तांत्रिक अडचणीमुळे डेटा गहाळ होणार नाही.
-
सर्व टॅब पूर्ण भरून झाल्यावर माहिती DDO (आहरण व संवितरण अधिकारी) कडे मान्यतेसाठी (Forward for Approval) पाठवा.