मी, प्रमोद पुरी ,वरिष्ठ लिपिक, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,अमरावती येथे कार्यरत असून माघील तब्बल दीड वर्षांपासून यु-ट्यूब,ब्लॉग,फेसबुक आणि व्हाट्सअप्प सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील हजारो कर्मचार्यांशी संपर्कात आहे.लिपिक वर्ग प्रशासन व्यवस्थेतील महत्वाचा घटक असल्या कारणाने कार्यालयीन कामकाज करतांना सर्वात जास्त अडचणी ह्या लिपिक वर्गाला येतात.मागील वर्षी 30 जानेवारी 2019ला राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून त्याची अधिसूचना निर्गमित झाली आणि कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चिती कशी करावी ..?असे प्रश्न आपल्या वर्गाला पडले आणि आपल्याला असलेले ज्ञान सर्वांनपर्यंत पोहचविण्यासाठी वरील सर्व सोशल मीडियाचा वापर करण्यात आला. कार्यालयीन काम करतांना किंवा सातवा वेतन आयोगाचे fixation करतांना येणाऱ्या अडचणी यु-ट्यूब च्या माध्यमातून सोडविल्या नंतर माझ्या उपक्रमाची दखल घेत यशदा पुणे येथे सातवा वेतन आयोगाच्या प्रशिक्षणासाठी माझी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली ज्याचा परिणाम असा झाला की राज्यातील बहुतांश कर्मचार्यांना अधिकृत कार्यालयीन कामकाजाचे मार्गदर्शन करता आले.तसेच उपसंचालक ,लेखा व कोषागार, अमरावती येथे मी प्रशिक्षक असून अमरावती जिल्ह्यातील कर्मचार्यांना सुध्दा मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.वरील सर्व जबाबदारी,संधी आणि इतरांना मदत करण्याचा भावनेने राज्यातील कर्मचाऱ्यांचे व्हाट्सअप्प समूह करून सुरुवातीला मदत केल्या गेली परंतु कर्मचाऱ्यांची वाढती संख्या पाहता सर्व कर्मचारी त्यानंतर टेलिग्रामच्या चॅनेलशी जोडले गेले.कर्मचार्यांना शासन निर्णय,अधिसूचना,वेगवेगळे नियम,ऑनलाईन सेवार्थ माहिती,वेतनिक हाताळणी,बजेट मॅनेजमेंट सिस्टीम, बिल पोर्टल,निवृत्तिवेतन,कोशवाहिनी संदर्भातील सर्व माहिती सुरुवातीला “शासकीय सेवार्थ ब्लॉग” च्या माध्यमातून कर्मचार्यांना पर्यंत पोहचविण्यात येते होती.ब्लॉग वर कर्मचार्यांना प्रत्येक प्रश्नाचे समाधान यु-ट्यूब वरील विडिओ च्या माध्यमातून होत असल्याने माझ्या ब्लॉगला कमी कालावधीत लाखो भेटी झाल्या,परंतु ब्लॉग ला येणाऱ्या अडचणी आणि जवळच्या लोकांनी दिलेल्या सल्ल्यामुळे मी आज आपल्या समोर “नवीन वेबसाईट तयार केली आहे आणि त्याचा मुख्य उद्देश कर्मचार्यांना कार्यालयीन येणाऱ्या अडचणी सोडविणे.कर्मचाऱ्यांसाठी नव्याने ” http://pramodpuri.com” ” ही वेबसाईट तयार केली आहे.आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी एक सक्षम प्रयत्न मी करत आहे त्याचा फायदा नक्की आपल्याला होईल. राज्यातील खूप कर्मचार्यांशी सोशल मीडिया च्या माध्यमातून संपर्क येत असल्याने मला सुध्दा आपल्या कडून खूप शिकता येत आहे ,तसेच माझ्या कडे असलेले ज्ञान नव्या रूपाने तुमच्या पर्यंत पोहचविण्यासाठी तयार केलेल्या माझ्या वेबसाईट ला नक्की भेट द्या,ही विनंती.
नमस्कार…!
आपले सहकार्य असेच मिळत राहो ही अपेक्षा,धन्यवाद.
✒️कायम आपलाच
प्रमोद पुरी