सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मृत्यु नंतर त्यांचे दिव्यांग अपत्यास काय लाभ मिळतो?
जे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना मयत झाल्यानंतर त्यांना जर मानसिक विकलांग शारीरिक दुर्बलता असणारे अपत्य असेल तर त्या मुलांना त्यांचे आई-वडील वारल्यानंतर त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरिता त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळते त्याकरिता काही उपाययोजना कराव्या याबाबत थोडे विवेचन करूया.वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन जुलै 1991 नुसार तसेच 20 एप्रिल 1995 विकलांग मुलांना कुटुंब निवृत्ती वेतन देण्यासंबंधी तरतूद केली आहे तसेच यानंतर वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 8 ऑक्टोंबर 2018 नुसार मार्गदर्शन केले आहे त्याच अनुषंगाने शासकीय कर्मचारी यांचे मृत्यूनंतर पती व पत्नी दोन्ही ही मयत झाल्यानंतर त्यांचे मानसिक विकलांग शारीरिक दुर्बलता असणाऱ्या अपत्यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळते याकरिता शासकीय कर्मचारी यांनी त्यांचे निवृत्त वेतन प्रकरण महालेखाकार येथे पाठवीत असताना विकलांग पत्त्यांचे अपत्यांचे नावाचे समावेशन करावेकुटुंब निवृत्ती वेतन प्रकरण मधील नमुना 3 मध्ये कुटुंबाच्या तपशील मध्ये मानसिक शारीरिक विकलांगता दुर्बलता सणार्या पण त्यांच्या नावाचा समावेश करावा वयाची खात्री मंजुरी प्राधिकारी यांनी करून घ्यावी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र अनुसार विविध दस्तऐवज निवृत्तीवेतनाच्या प्रकरण सोबत सादर करावाकर्मचारी मृत्यू पावल्यानंतर त्याचे विकलांग मुलांनी या कार्यालयात त्यांचे वडील डील सेवानिवृत्त किंवा मृत झाले असेल त्या कार्यालयाकडे अर्ज सादर करावा.