Table of Contents
Nomination vs. Inheritance Act
नॉमिनी/नामनिर्देशन वारसाची ( Inheritance ) सर्वसाधारण व्याख्या–
Nomination vs. Inheritance Act :- Nomination ही सज्ञा सर्वसामान्यपणे आर्थिक जमा पुंजीच्या संदर्भात आपणास ऐकण्यास मिळते. Nomination अथवा नामनिर्देशन म्हणजे एखादया व्य्क्तीच्या पश्चात म्हणजेच त्याच्या मृत्युनंतर त्याचेजवळील स्थावर मालमत्तेचे नियोजन करण्याचे अधिकार ज्यास प्रधान केले जातात, त्या व्यक्तीस आपण नॉमिनी/Nomination असे संबोधितो.
उदाहाराणार्थ अ नावाच्या व्यक्तीने रुपये एक करोडचा जीवन विमा काढला असल्यास सदरील विमाचा अर्ज भरताना त्याच्या मृत्युनंतर सदरील रक्कमेची हाताळणी अथवा नियोजन कोण करेल या संदर्भात त्याची माहिती अ नावाच्या व्यक्तीला अर्ज भरताना दयावी लागते. जर दुर्देवाने अ नावाचा व्यक्तीचे निधन जीवन विमा अस्तीत्वात असताना झाले तर अशावेळी विमाच्या रक्कमे संदर्भातील कारवाई करणेचा संपुर्ण अधिकार हा नॉमिनी/नामनिर्देशन यांना प्राप्त होतो. नॉमिनी/नामनिर्देशन याचे मुख्य वैशिष्टय म्हणजे सदरील व्यक्ती नॉमिनी/Nomination हा जिवंतपणी करतो, त्याची अंमलबाजवणी ही त्याचे मृत्युपश्चात होते. ( Nomination vs. Inheritance Act )
सर्वसाधारणपणे एखादा व्यक्ती मयत झाल्यांनतर त्याची स्थावर व अस्थावर मालमत्ता ज्या व्यक्तीस जाते, त्यास आपण कायदेशीर वारस म्हणताे. उदाहाराणार्थ हिंदु वारसा कायदा अंतर्गत वर्ग १ व २ अशी वारसांची वर्गवारी करण्यात आली आहे. जर हिंदु हा कुठलेही मृत्युपत्र न बनवता मयत झाला असल्यास त्याची संपत्ती ही, वर्ग १ मध्ये नमुद असलेल्या वारसांना समान हिस्स्याने प्राप्त होईल व वर्ग १ मधील कुठलेही वारस उपलब्ध नसल्यास सदरील संपत्ती वर्ग २ च्या वारसांना उपलब्ध होते. म्हणजेच वारस कोण असावते हे कायदयानेच ठरवलेले आहे. त्यामध्ये कोणीही व्यक्ती बदल करु शकत नाही.
मृत्युपत्र- Deed of Declaration
मृत्युपत्रान्वये देखील व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याच्या संपत्तीची विल्हेवाट कशी लावावी याबाबत व्यक्ती ठरवू शकतो. मृत्युपत्र करणेबाबत केवळ मुख्य अट अशी आहे की, मृत्युपत्रामध्ये नमुद मालमत्तेमध्ये मयत व्यक्तीचा अधिकार असणे गरजेचे आहे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्या संपत्तीबाबत मृत्युपत्र करुन ठेवत असे तर अशा परिस्थितीत इतर वारसा कायदयाप्रमाणे मालमत्तेचे हस्तांतरण हाेणार नाही तर मृत्युपत्रामध्ये ( Deed of Declaration ) नमुद असलेल्या इच्छेप्रमाणे सदरील मालमत्तेचे हस्तांतरण होते. मृत्युपत्रामध्ये ज्या व्यक्तीस मालमत्ता हस्तांतरण करण्याची इच्छा नमुद केली असेल तो व्यक्ती मयत इसमाचा वारस, नातेवाईकच असणे गरजेचे नाही.
वरील मजकुरावरुन आपणास एक बाब लक्षात आली आहे की, नामनिर्देशन व मृत्युपत्रामध्ये व्यक्ती त्याच्या मृत्यु अगोदरच त्याची संपत्ती कोणास जाईल किंवा त्याचा सांभाळ कोण करेल याबाबत आपल्या सदविवेक बुध्दी ठरवतो. तर वारसा कायदयाप्रमाणे वारस ठरविण्याचा अधिकार नसतो.
Nomination vs. Inheritance Act
( Nomination vs. Inheritance Act ) नामनिर्देशन वि. वारसा कायदा वारसा कायदा वि. नामनिर्देशन/नॉमिनी या दोन्हींनी जर मयताच्या संपत्तीस आपला अधिकार सांगितल्यास कायदयाप्रमाणे सदरील संपत्तीचे हस्तांतरण कोणास करावे ? या संदर्भात सहजतेने जाणुन घेण्याकरिता खालीलप्रमाणे उदाहारण देण्यात येते.
उदाहाराणार्थ-
अ नावाच्या व्यक्तीने एक करोड रुपयांचा जीवन विमा काढला व सदरील जीवन विम्यास त्याची पत्नी ब हिला नॉमिनी म्हणून संपुर्ण रक्कमे करिता निवडले. दुर्देवाने अ चा मृत्यु झाला. त्याच्या पश्चात त्याची आई, त्याचा मुलगा व त्याची विधवा पत्नी हे त्याचे कायदेशीर वारस राहिले. मयताच्या पत्नीने विमा रक्कमेत तिला १००% नॉमिनी केले असल्यामुळे तिला विम्याची संपुर्ण रक्कम देण्यात यावी, असे विमा कंपनीस विनंती केली. तथापि, सदरील विनंतीस मयताची आई व मुलगा यांनी ते देखील मयताचे कायदेशीर वारस असल्याने त्यांना देखील सदरील रक्कमेत हिंदु वारसा कायदयाप्रमाणे त्यांचा हिस्सा मिळावा, याकरिता मागणी केली.
अशा परिस्थितीत १००% नॉमिनी असलेली पत्नी व वारसा कायदयाप्रमाणे वर्ग १ ची वारस असलेली पत्नी हिला रक्कम देण्यात यावी की, मयताची आई व मुलगा व पत्नी यांना सदरील रक्कम १/३ समान हिस्स्यात देण्यात यावी?
वर्ग १ :- आई, मुलगा, पत्नी, मुलाचा मुलगा (नातु) चार लोक प्रत्येक मुलगा आणि मुलगी आणि आईचा वाटा समान असेल.
वर्ग 2 :- वडील, काका, चुलत भाऊ जर एखादा हिंदू पुरुष मरण पावला, व तो अविवाहित असेल आणि ज्याचा class II वारस असेल, तो मालमत्ता II वर्गाच्या वारसांमध्ये विभागला जाईल
वरीलप्रमाणे वाद हा मा.सर्वोच्च न्यायालय यांच्यासमक्ष उपस्थित झाला होता. मा.सर्वोच्च न्यायालय यांनी त्यावेळेस विमा कायदाचा कलम ३९ चे सखोल्यात विवेचन केले व त्यामध्ये असे प्रतिपादन केले की, विमा कायदाचा कलम ३९ नुसार जरी नॉमिनेशन केले असलेतरी नाॅमिनी हा केवळ विम्याची रक्कम अथवा ज्याकरिता त्याला नॉमिनी केले आहे, ती संपत्ती ग्रहण करणेचा अधिकार त्यास प्राप्त होते, तर सदरील संपत्ती अथवा रक्कमेचा तो केवळ विश्वस्त अथवा व्यवस्थापक म्हणून काम बघतो व वारसा कायदान्वये नमुद असलेले वारसांना सदरील रक्कम त्यास सुपुर्द करावी लागेल, असा निवाडा हा मा.सर्वोच्च न्यायालय यांनी शरवतीदेवी वि. आशादेवी, एआयआर १९८४ एससी ३४० यामध्ये दिला आहे.
मा.सर्वोच्च न्यायालय यांच्या न्यायनिवाडयाचे अवलोकन केले असता, वारसा कायदयाप्रमाणे असलेला वारस यांचा हक्क हा प्रथम असल्याचा व नाॅमिनी हा केवळ सदरील रक्कमेचा विश्वस्त असल्याचे दिसून येते.
सबब, इसमाच्या मृत्युनंतर मालमत्ता ही स्थावर असेल तर सक्सेशन सर्टीफिकेट, अस्थावर मालमत्ता असल्यास हिअरशिप सर्टीफिकेट व मृत्युपत्र असल्यास प्रोबेटची आवश्यकता राहते.
शासकिय कर्मचारी अधिकारी यांनी सेवेत लागल्या नंतर लगेच खालील नमुने भरून कार्यालयास सादर करावे तसेच त्यांचे लग्ना नंतर पत्नी / पतीचे नाव अद्यावत करावे तसेच आधी दिलेले नामनिर्देशन रद्द करून सदरचे अद्यावत करणे बाबत पत्र द्यावे व त्याची पोच दुय्यम सेवापुस्तकात चिटकुन ठेवावी.
गट विमा योजना :-
गट विमा योजना ही 1982 पासुन सुरू झाली असुन कर्मचाऱ्याचा मुत्यू झाल्यास त्यांचे वारसांना रूपये अनुक्रमे 2.40, 3.60, 4.80, 9.60 लक्ष मिळते, भविष्यात वारसांना त्रास होऊ नये म्हणुन खालील लिंक चा नमुना डाऊनलोड करून तो भरून कार्यालयास सादर करावा.
भविष्य निर्वाह निधी :-
जे शासकिय कर्मचारी हे 2005 पुर्वी शासन सेवेत लागले आहेत व ज्यांची भविष्य निर्वाह निधी कपात होते अशा कर्मचारी यांनी खालील नमुने भरून कार्यालयास सादर करावे तसेच त्यांचे लग्ना नंतर पत्नी / पतीचे नाव अद्यावत करावे तसेच आधी दिलेले नामनिर्देशन रद्द करून सदरचे अद्यावत करणे बाबत पत्र द्यावे व त्याची पोच दुय्यम सेवापुस्तकात चिटकुन ठेवावी.
कर्मचाऱ्याचा मुत्यू झाल्यास त्यांचे वारसांना रूपये मृत्युच्या दिनांकास शिल्लक असलेली रक्कम व्याजासह मिळते तसेच मृत्यु झाल्यामुळे लिंक इंन्सुरन्स रूपये 60,000/- मिळते. त्यामुळे भविष्यात वारसांना त्रास होऊ नये म्हणुन खालील लिंक चा नमुना डाऊनलोड करून तो भरून कार्यालयास सादर करावा.
कुटूंबाचा तपशिल :-
कुटूंबाचा तपशिल हा वेळोवेळी कार्यालयास भरून द्यावा. जेणे करून कर्मचाऱ्याचे मृत्यु नंतर काही न्यायालयीन भनगडी होणार नाही.
खालील लिंक चा नमुना डाऊनलोड करून तो भरून कार्यालयास सादर करावा.
मृत्यु-नि-सेवा-निवृत्ती उपदानाकरीता नामनिर्देशन :-
शासकिय कर्मचाऱ्यास कुटूंब असेल अशा वेळी तो एकास किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांना या करीता नामनिर्देशीत करू शकतो.
खालील लिंक चा नमुना डाऊनलोड करून तो भरून कार्यालयास सादर करावा.
कुटूंब निवृत्ती वेतनासाठी नामनिर्देशन :-
कुटूंब निवृत्ती वेतनासाठी नामनिर्देशन करावे जेणे करून कुटूंब निवृत्ती वेतन हे आपल्या कुटूंबीयास मिळेल.
खालील लिंक चा नमुना डाऊनलोड करून तो भरून कार्यालयास सादर करावा.