Medical ReimbursementMedical Reimbursement

Medical : Its all about medical reimbursement

Medical : वैद्यकीय प्रतिपूर्ती बद्दल आपण हे जाणता का?

Medical वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक आपणास कार्यालयास सादर करताना बऱ्याच अडचणी येतात व त्यामुळे आपणास मानसिक त्रास होते व हा त्रास कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवातीपासूनच जर प्लॅनिंग केले तर त्रास कमी होईल.

याकरिता प्रथम स्वतःकरिता वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकचे अनुषंगाने वैद्यकीय उपचार करायचा असेल तर, कार्यालयात रजेचा अर्ज सादर करावा, जेव्हा शासकीय कर्मचारी यांना अचानक वैद्यकीय उपचार घ्यायचा असेल किंवा घ्यावा लागते अशा वेळेस रजेचा अर्ज कार्यालयात सादर करावा तसेच कार्यालयात माहिती द्यावी. Medical वैद्यकीय प्रतिपूर्ती तयार करताना 28 आजार पैकी किंवा पाच गंभीर आजार या पैकी एका कोणत्याही आजारांमध्ये आपला आजार समाविष्ट असला पाहिजे,

Medical प्रतिपूर्ती देयक कसे तयार करावे?

जर नसेल तर 2005 चे शासन निर्णयानुसार सदरचा वैद्यकीय प्रतिपूर्ती शासनाकडे सादर करावी लागेल. ज्या दवाखान्यात इलाज केला आहे व आपला आजार हा गंभीर असेल तर शासनाने नेमून दिलेल्या दवाखान्यातच शक्यतो इलाज कराव,  जर केला नाही तर आपले वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक चे प्रकरण शासनास सादर करावे लागेल. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डिस्चार्ज कार्ड यामध्ये ॲडमिशन तारीख व रिचार्ज तारीख हे दोन्ही दिवस धरून या कालावधीतीलच Medical वैद्यकीय प्रतिपूर्ती देय आहे.

इलाज हा पुढील तारीख असेल किंवा आधीची असेल व कोणत्याही प्रकारच्या टेस्ट किंवा औषध घेतली असेल तर ते देय होणार नाही. दवाखान्यात प्रवेश केला तेव्हापासून ते दवाखान्यातून डिस्चार्ज होईपर्यंत सर्व कागदपत्रे सांभाळून ठेवावी व खाली दिलेल्या एक्सेल शीट मध्ये आपली माहिती भरावी व आपले वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक तयार होईल.

सदरचे Medical Reimbursement देयक बिल पोर्टल वरून कसे तयार करावे या  बाबतचा व्हिडीओ या पुर्वीच तयार केला असुन त्या करीता येथे क्लिक करावी.

वैद्यकीय खर्चाची परिगणना
संदर्भ : सार्वजनिक आरोग्य विभाग,मंत्रालय,मुबंई
शासन निर्णय क्रमांक एमएजी. 2005/9/ प्र.क्र.1/आरोग्य-3 दिनांक 11 मार्च 2005
             
कर्मचाऱ्याचे नाव    श्री.अनिल ……………..
रुग्णाचे नाव    अनिल ………………..स्वत:
रुग्णालयातील वास्तव्याचा काळ    दिनांक 26.09.2020 ते 02.10.2020
रुग्णालयाचे नाव   Dr…………..
आजाराचे नाव   ………………………
अ.क्र. तपशील एकुण खर्च
1 2 3
1 एकुण खर्च   ₹ 41,259.00
2 ना-देय खर्च   ₹ 0.00
3 प्रत्यक्ष खर्च (1-2)   ₹ 41,259.00
4 प्रत्यक्ष खर्चापैकी औषधेापचाराचा खर्च (Bed Charges)   ₹ 2,400.00
5 प्रत्यक्ष खर्चापैकी औषधोपचाराचा खर्च (3-4)   ₹ 8,269.00
6 औषधोपचारासाठी अनुज्ञेय खर्चाचे प्रमाण    
  (औषधोपचारावरील प्रत्यक्ष खर्चापौकी प्रतिपुर्तीचे प्रमाण 90%) ₹ 8,269.00 ₹ 7,442.10
  (शासनमान्य रुग्णालयातील औषधोपचाराच्या खर्चाची 100% प्रतिपुर्ती ) ₹ 30,590.00 ₹ 27,531.00
7 रुग्णालयात वास्तव्याचे दिवस 6  
8 वास्तव्यातील केलेला खर्च ₹ 2,400.00 ₹ 34,973.10
          Total ₹ 34,973.10
9 रुग्णालयातील वास्तवयासाठी अनुज्ञेय खर्चाचे प्रमाण    
अ.क्र. वास्तव्याचा प्रकार प्रत्यक्ष खर्च अनुज्ञेय रक्कम देय रक्कम  
1 जनरल वॉडर् (सर्वसामान्य कक्ष) 2400 90% ₹ 2,160.00  
2 अतिदक्षता कक्ष (I.C.U) 0 100% ₹ 0.00  
3 बाथरुमसह स्वतंत्र कक्ष 0 75% ₹ 0.00  
4 बाथरुमसह डबल बेड  कक्ष   75% ₹ 0.00  
5 बाथरुमसह वातानुकूलीत कक्ष (विमान प्रवास सवलत अनुज्ञेय असलेल्या कर्मचाऱ्यासांटी )   75% ₹ 0.00  
      ₹ 2,160.00  
                   एकुण (9) = वास्तव्यापोटी एकुण देय रक्कम ₹ 2,160.00
10  एकुण देय खर्च (6+9)         ₹ 37,133.10
          एकुण रक्कम पुर्णांकात ₹ 37,133.00
  Rs Thirty Seven Thousand One Hundred Thirty Three Only

Excel sheet for preparation of medical reimbursement bill  वैद्यकिय प्रतिपुर्ती नमुना  Excel file सदरचे देयक आपले कार्यालयास एका वर्षाच्या आत सादर करावयाची आहे Medical (वैद्यकीय प्रतिपूर्ती 1961  नीयम 11 ) सुरुवातीला कार्यालय देयक सादर करणे महत्त्वाचे आहे त्यानंतर कार्यालयाने आक्षेप लावला असेल तर तो विलंबा मध्ये येत नाही.

Medical Reimbursement  Excel File password protected password for Excel File 1045

जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे आजार प्रमाणिक करण्याकरिता तीन टक्के रक्कम द्यायची नाही.

शासकीय कर्मचारी यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे आजार प्रमाणिक करण्याकरिता तीन टक्के रक्कम द्यायची नाही ती रक्कम फक्त जिल्हा परिषद खाजगी, संस्था यांना आकारल्या जाते जिल्हा परिषद मधील राज्य शासनाचे कर्मचारी यांनासुद्धा तीन टक्के रक्कम भरावी लागत नाही. याबाबत बऱ्याच ठिकाणी संभ्रम निर्माण झालेला आहे,

 

सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 28 डिसेंबर 2015 मध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये पुराणात येणाऱ्या तपासणी सेवा व त्याबाबतचे रुग्ण शुल्क हा करण्याबाबत सुधारित रुग्ण शुल्क लागू केले आहे त्या अनुषंगाने अनुक्रमांक एक प्रशासकीय विभाग अंतर्गत ड मधील अनुक्रमांक बारा मध्ये वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळण्यासाठी प्रमाणपत्र देयकाच्या एकूण रकमेच्या तीन टक्के शुल्क पृष्ठ क्रमांक तीन वर नमूद केले आहे.

तसेच पृष्ठ क्रमांक 48 वर नमूद केले आहे की यापूर्वी शासनाने वेळोवेळी काढलेल्या आदेशानुसार ज्या संवर्धना विनाशुल्क वैद्यकीय उपचाराची सवलत देण्यात आली आहे ती यापुढे चालू ठेवण्यात येणार असून त्यामध्ये अनुक्रमांक 2,3,5 येथील शासन निर्णयात देण्यात आलेल्या सवलतीचा समावेश राहील सदर सवलत खालील संवर्ग ना लागू राहील I) राष्ट्रीय कर्मचारी व त्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय.

Vaidyakiya shikshan vibhag 20/11/2017  page 1

Vaidyakiya shikshan vibhag 20/11/2017 2

Vaidyakiya shikshan vibhag 20/11/2017
Vaidyakiya shikshan vibhag 20/11/2017 3

सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे शासन निर्णय दिनांक 21/08/1999 नुसार शासकिय महीला कर्मचारी किंवा कर्मचारी अधीकारी यांची पत्नी गर्भ धारण झाल्यानंतर २ महीने ते ३ महीन्याचे आत शासकिय / जिल्हापरिषद किंवा महानगर/नगरपालीका मधील रुग्णालयात किंवा नेमुन दिलेल्या दवाखान्यामध्ये नाव नोंदणी करणे आवश्यक आहे व ती जर नसेल तर Medical वैद्यकिय प्रतिपूर्ती देयक मिळणार नाही असे स्पष्ट नमुद आहे.

Pregnancy
Pregnancy ANC

Medical  प्रतिपुर्ती देयक संदर्भात काही महत्वाचे शासन निर्णय.

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, 1961

आकस्मिकता उदभवणारे 23 गंभीर आजारावर तसेच 5 गंभीर आजारावर खाजगी रुंग्णालयात विशिष्टोपचारावरील वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती 29/07/1999

सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई, शासन निर्णय दिनांक  21/08/1999

सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई, शासन निर्णय दिनांक 16/11/2011

सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई, शासन निर्णय दिनांक 19/03/2005

शासकीय कर्मचारी/अधिकारी यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती प्रकरण 5 गंभीर आजारांकरीता सर्व प्रकारच्‍या कॅन्‍सरचा समावेश करणे-अग्रीमाचा मर्यादा रुं.100000/- वरुंन रुं.150000/- पर्यंत वाढविल्याबाबत. 10/02/2006

गंभीर आजारांमध्ये अवयव प्रतिरोपण व काही नवीन आजारांचा समावेश करुन सदर आजारांवरील औषधोपचाराकरिता अग्रीम मंजूर करणेबाबत (Liver Transplant),(Heart Transplant),(Lung Transplant),(Bone Marrow Transplant),(Cochlear Transplant),(Heart & Lung Transplant (Together)27/03/2020

अपत्य

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ … प्रसुतीशास्त्र व स्त्रीरोग संबंधातील आकस्मिक आजाराच्या बाबतीत वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याबाबत 25/09/2014

शासकीय कर्मचा-यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी कर्करोग या गंभीर आजारावर शासकीय व शासनमान्य खाजगी रुग्णालय वगळून इतर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरी बाबत.28/09/2016

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारात सुधारणा करणेबाबत 16/03/2016

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधून देण्यात येणाऱ्या तपासणी व त्याबाबतच्या रुग्णशुल्काबाबत 28/12/2015

राज्यातील वरिष्ठ नागरिकांना शासकिय रुंग्णालयातून विनाशुल्क सेवा देण्याबाबत. 21/07/2004

Medical Reimbursement करीता उपलब्ध असलेले शासन निर्णया करीता येथे क्लिक करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *