- Promotion पदोन्नती होण्याकरीता हे जाणून घ्यावे
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक 20 एप्रिल 2021 नुसार शासनाने यापूर्वी जो 18 फेब्रुवारी 2021 ला शासन निर्णय पारित केला होता तो शासन निर्णय रद्द करण्यात आला व दिनांक 29/ 12/ 2017 शासन निर्णय रद्द करण्यात आला.
परंतु आता या शासन निर्णय द्वारे 29 डिसेंबर 2017 चे पत्र रद्द करण्यात आले
त्यामुळे आता आपणास पदोन्नतीने खुल्या प्रवर्गाची रिक्त पदे असेल तेवढीच पदे पदोन्नतीने सेवाज्येष्ठतेनुसार भरावयाची आहे (67%)
ज्या मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांना आरक्षणाचा लाभ दिला आहे व ते सेवाज्येष्ठता यादीत वरच्या स्थानावर आले आहे त्यांच्याकरिता खालील दोन प्रकारे विचार करावा लागेल
अ) दिनांक 25 मे 2004 रोजी किंवा त्यापूर्वी शासन सेवेत पदोन्नतीने रुजू झाले असल्यास सेवाज्येष्ठतेनुसार पुढील पदोन्नती पात्र राहील.
ब) जे दिनांक 25 मे 2004 नंतर शासन सेवेत आरक्षणाचा लाभ घेऊन पदोन्नत झालेले असेल त्यांना मुळ पदाच्या सेवाष्ठते नुसार पुढील पदोन्नतीस पात्र राहील.
याकरिता आपण 25 मे 2004 शासन निर्णयाचे अवलोकन करावे
For Excel Sheet
Promotion
G.R. Date