अंतिम वेतन प्रमाणपत्र (LPC) तयार करणे, कार्यमुक्त (Relieve) करणे आणि नवीन कार्यालयात रुजू (Join) करून घेणे
नवीन सेवार्थ प्रणालीमधून अधिकारी/कर्मचाऱ्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र (LPC) तयार करणे, कार्यमुक्त (Relieve) करणे आणि नवीन कार्यालयात रुजू (Join) करून घेणे याविषयीची सविस्तर मुद्देनिहाय माहिती खालीलप्रमाणे आहे:
१. आवश्यक पूर्वतयारी व कागदपत्रे प्रणालीमध्ये माहिती भरण्यापूर्वी खालील सर्व कागदपत्रे/माहिती पीडीएफ (PDF) स्वरूपात (साइज २ KB ते १०० KB) तयार असावी:
-
बदलीचे व कार्यमुक्त आदेश
-
सध्याच्या कार्यालयातील व पूर्वीच्या कार्यालयातील विभागीय चौकशीचे प्रमाणपत्र (DE / No DE Order)
-
ना देय प्रमाणपत्र (No Due Certificate)
-
प्रलंबित वसुली, नैमित्तिक रजा (Casual Leave) तपशील
-
कर्मचाऱ्यांकडील परत न केलेली शासकीय पुस्तके व इतर साहित्य/हार्डवेअर (रकमेसह)
-
नवीन कार्यालयाचा १० अंकी DDO कोड व नाव
२. मेकर लॉगिन: Transfer Details (भाग-१)
-
टॅब:
Establishment<Promotion / Transfer<Transfer to another Office (General Transfer/ With Promotion/Any Other reason)वर जाऊन कार्यालय व पदनाम निवडून कर्मचाऱ्याची निवड करावी. -
Transfer Order Details: बदली आदेश क्रमांक, दिनांक, बदलीचा प्रकार (General, Promotion इ.) व कारण (Administrative / Own Request) अचूक भरावे.
-
Transferred to which Office:
Search to select Officeवर क्लिक करून नवीन कार्यालयाचा DDO कोड टाकून संबंधित कार्यालय सिलेक्ट करावे. -
Relieving Details: कार्यमुक्त आदेश क्रमांक, दिनांक आणि कार्यमुक्त वेळ (म.पू. Before Noon / म.नं. After Noon) निवडून SAVE करावे.
३. मेकर लॉगिन: LPC Details (भाग-२)
LPC Details टॅबमधील खालील ११ उप-विभागांत आवश्यक माहिती भरावी:-
Employee Details: वैयक्तिक माहिती तपासावी (Non-Editable).
-
Transfer Order Details: कार्यमुक्ती आदेशाची पीडीएफ फाईल अपलोड करावी.
-
Current DE Details: सध्याच्या कार्यालयात विभागीय चौकशी सुरू आहे का (Yes/No) ते निवडून No DE प्रमाणपत्र अपलोड करावे.
-
Previous DE Details: पहिल्यांदाच LPC काढत असल्यास पूर्वीच्या कार्यालयातील DE माहिती व No DE पत्र अपलोड करावे.
-
Pending Loan & Advances: उपलब्ध कर्ज/अग्रिम वसुलीची खात्री करावी.
-
No Due Certificate: सक्षम प्राधिकाऱ्याचे ना-देय प्रमाणपत्र अपलोड करावे.
-
Increment Details: चालू आर्थिक वर्षातील मागील, सध्याची व पुढील वेतनवाढीचा तपशील भरावा/तपासावा.
-
GIS Details: गट विमा योजनेचा तपशील तपासावा.
-
Casual Leave: मंजूर, उपभोगलेली व शिल्लक नैमित्तिक रजेचा तपशील भरावा.
-
Unreturned Publications/Hardware: परत न केलेल्या पुस्तकांची/साहित्याची माहिती (किमतीसह)
Addकरावी (नसल्यासNoनिवडावे). -
Unsettled Govt. Advances: बदली प्रवास भत्ता (TA), LTC किंवा इतर प्रलंबित अग्रीम रकमांची नोंद करावी.
-
सर्व माहिती भरल्यानंतर SAVE करून Forward to DDO बटनावर क्लिक करावे.
४. चेकर (DDO) लॉगिन: पडताळणी व मंजुरी
-
टॅब:
Establishment,<Verification<<Verification of Task pending<Transfer/Relieving Details. -
संबंधित कर्मचारी सिलेक्ट करून सर्व माहिती व अपलोड केलेले दस्तऐवज तपासावेत.
-
खाली दिलेल्या View Draft LPC व View NO DE CERTIFICATE ची पडताळणी करावी.
-
सहमतीच्या (Consent) चेकबॉक्सवर टिक करून Verify बटनावर क्लिक करावे व येणारे सर्व पॉप-अप मेसेज
OKकरावेत. -
यानंतर अंतिम वेतन प्रमाणपत्राची (LPC) पीडीएफ फाईल तयार होऊन उपलब्ध होईल.
५. मेकर लॉगिन: कार्यमुक्ती प्रक्रिया पूर्ण करणे
-
टॅब:
Establishment=Promotion / Transfer=Generate LPC=Transferred Employees. -
Employees Relieved By Current DDOनिवडून कर्मचाऱ्याची निवड करावी. -
प्रथम Download LPC आणि त्यानंतर New Generate LPC या बटनांवर क्लिक करणे बंधनकारक आहे (ही पायरी पूर्ण केल्याशिवाय कर्मचारी नवीन कार्यालयात रुजू होण्यासाठी सिस्टीममध्ये दिसणार नाही).
६. नवीन कार्यालयात रुजू (Joining) करून घेणे
-
मेकर लॉगिन:
Establishment=Promotion / Transfer=Joining after Transfer / Repatriation.-
Searchमध्ये Sevaarth ID, PAN किंवा LPC ID टाकून कर्मचारी शोधावा वSelect & Returnकरावे. -
रुजू प्रकार (Regular), रुजू आदेश क्रमांक/दिनांक, प्रत्यक्ष हजर दिनांक (म.पू. / म.नं.), City Class आणि Designation निवडून SAVE करावे.
-
-
चेकर (DDO) लॉगिन:
Establishment=Verification=Verification of Task pending=Joining Detailsमध्ये जाऊन माहिती तपासून Verify करावी. -
कर्मचारी यशस्वीरीत्या रुजू झाल्यानंतर संबंधित वेतन देयकात (Bill Group) जोडून नियमानुसार वेतन देयक तयार करावे.