D.A. Arrears July 2021 to March 2022
महागाई भत्ता दिनांक .1.7.2021 रोजी 17% होता व 1 ऑक्टोबर 2021 पासुन तो 28% झाला होता व त्यानुसार आपण वेतन घेतलेले आहे. आता 30 मार्च 2022 चे शासन निर्णयानुसार दिनांक 01.7.2021 पासुन महागाई भत्ता हा 31% करण्यात आला आहे.
तसेच सदरचा महागाई भत्ता दर हा 1.7.2021 पासुन 31% झाला असल्यामुळे व पुर्वी तो 17% असल्यामुळे माहे जुलै ते सष्टेंबर 2021 पर्यत 17% ते 31% महागाई भत्ता वाढल्यामुळे या तिन महीन्याची थकबाकी ही 14% ची होईल.
तसेच आक्टोबर 2021 पासुन 28% महागाई भत्ता घेतला असल्यामुळे तेव्हा पासुन 3% ची वाढ होईल.
तसेच आक्टोबर 2021 पासुन घरभाडे भत्ता हा महागाई भत्ता 25% चे वर गेल्यामुळे आपण तो सुधारीत 9%,18% व 27% नुसार घेतला आहे. त्यामुळे आता जुलै ते सष्टेंबर 2021 या कालावधीत महागाई भता 25% चे वर गेल्यामुळे जुलै 2021 पासुन सुधारित घरभाडे भत्ता लागु असल्याने जुलै ते सष्टेंबर 2021 या तीन महीन्याचे घरभाडे भत्ता लागु होतो.
महागाई भत्त्याचे विवरणपत्र तयार करण्याकरीता Excel Sheet तयार केली असुन त्यानुसार माहीती तयार करावी व या वेळी जुलै ची वेतनवाढ व जानेवारी वेतनवाढीनुसार तयार केले आहे. सर्व माहीती शिट नुसार एकत्रीत करून Abstract करून घ्यावा. व तेथे प्रमाणपत्र द्यावे. Feb 2022 P.T. 300 दुरूस्ती करावी. 200 झाले तेथे 300 करावे
आपणास जर Excel Sheet कशी तयार केली या बाबतचा Video पाहीजे असल्यास
Excel spreadsheet download ↓
DA-arreus-01-July-21-To-31-march-22 (31%)
राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारीत दराने घरभाडेभत्ता मंजूर करण्याबाबत
थकबाकीचे देयक तयार करताना ते कशे करावे या करीता या Video ची मदत घेऊ शकता