शासन निर्णय-अधिसूचना कशी शोधावी? हा व्हीडीओ पाहून आपणास सुद्धा आश्चर्य वाटेल की, इतका सोपा मार्ग शासन निर्णय शोधण्याचा!!!

One thought on “How to Find G.R, Acts and Rules”
  1. सन्माननीय सर मी भारतीय डाक विभागाच्या मेल मोटार सर्व्हिस वरळी मुंबई येथे वाहन चालक या पदावर कार्यरत आहे सर आम्हाला भरती च्या वेळी staff car driver या ग्रेड वर भरती केलं गेलं होतं पण त्यानंतर जेव्हा आम्ही रुजू झालो तेव्हा आम्हाला HMV हेव्ही गाड्या देखील चालवण्यासाठी जबरस्ती केली जाते आम्हाला हेव्ही ग्रेड नसून ऑर्डनरी ग्रेड आहे आणि आमच्याकडून हेव्ही गाड्या चालवून घेतल्या जातात. दुसरी बाब म्हणजे आमच्या डिपार्टमेंट मध्ये हेव्ही गाड्या घेऊन नागपूर, बेळगाव,अहमदाबाद अशा लांब पल्ल्याच्या ड्युटी लावतात त्यात दोन वाहनचालक देतात आणि या ड्युट्या कुठलाही आराम न करता सतत चालू असतात एक वाहनचालक गाडी चालवत असेल तर दुसरा वाहनचालक गाडीतच झोपवा असं कार्यालयाकडून आदेश आहेत गाडीत कसल्याही प्रकारे झोप किंवा आराम होत नाही मुंबई ते नागपूर ही ड्युटी सलग चार दिवस चालू असते जेव्हा वापस ऑफिस मध्ये ड्युटी संपवून आलो तर त्याचा फक्त दीड दिवसाचा रेस्ट दिला जातो व मुंबई ते बेळगाव व मुंबई ते अहमदाबाद या ड्युटी दोन रात्र आणि एल दिवस अशा आहे या ड्युटी चा आम्हाला कुठल्याही प्रकारे रेस्ट मिळत नाही. आम्हाला महिन्यात जवळपास ड्युटी व्यतिरिक्त साठ ते सत्तर तास ot ( ओव्हर टाईम ड्युटी ) लावली जाते आणि जर ot करण्यास विरोध केला तर रिपोर्ट करू कार्यवाही करू असं सुनावलं जातं आम्हाला रोस्टर हा प्रकार देखील अस्तित्वात नाही प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ड्युटी असतात कधी सकाळी पहाटे 5 वाजता तर कधी दुपारी 3 वाजता तर कधी सकाळी 10 वाजता तर कधी रात्री 8 वाजता आमच्या डिपार्टमेंट ला रोस्टर किंवा ठराविक ड्युटी असं काहीही नाहीय.

    सर मी आपल्या उत्तराची खूप अपेक्षेने वाट पहात आहे आपलं मार्गदर्शन मिळावं ही अपेक्षा आहे.

    आणि सर मी शासकीय कर्मचारी आहे मग मी आमच्या डिपार्टमेंट कडून माहितीचा अधिकारा खाली माहिती मागू शकतो का..?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *