Table of Contents
Leave
Leave रजा नियम क्रमांक 10 ते 12 शासकीय कर्मचाऱ्यास कामावर उपस्थित राहण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेली परवानगी म्हणजे रजा होय. रजा हा हक्क नसून रजाही कार्यालयीन कामाची निकड व परिस्थिती पाहून मंजूर करण्याचा निर्णय घेतला जाईल. रजा मंजूर करतेवेळी एखाद्या कार्यालयात एकाच वेळी अनेक अर्ज आले असेल तर एकत्र करून त्याचा विचार करावा व सहजगत्या करणार येईल याबाबत सक्षम प्राधिकरणाने विचार करायला हवा या ठिकाणी भेदभाव न करता रजा मंजूर करावी.
एका रजेचे दुसऱ्या प्रकारात परिवर्तन
रजा नियम क्रमांक 14 ते 16 एखाद्या कर्मचाऱ्यास एखादी रजा मंजूर झाल्यानंतर व ती त्याने उपभोगलेल्या नंतर त्याच्या विनंतीवरून अशी रजा भूतलक्षी प्रभाव आणि दुसऱ्या रजेच्या प्रकारात बदलता येते मात्र ज्या दिवसापासून अशी दुसरी रजा मंजूर करायची आहे त्या दिवशी असले पाहिजे.
Leave रजा जोडून घेणे
नियमानुसार मंजूर होऊ शकणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या रजा एकमेकांना जोडून घेता येतात मात्र किरकोळ रजेला जोडून या रजा घेता येत नाही कारण किरकोळ रजा ही महाराष्ट्र नागरी सेवा नियमाप्रमाणे मान्यताप्राप्त रजा नाही. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंत एखाद्या कर्मचाऱ्यास रजा मंजूर करता येते त्यापेक्षा जास्त कालावधी असेल तर त्यास शासनाची मंजुरी आवश्यक आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना देय अनुज्ञेय रजेचे Leave प्रकार
रजा नियम प्रकरण क्रमांक पाच ते सात मध्ये विहित करण्यात आले असून शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण व विशेष असे अर्जांचे पुढील प्रकार उपलब्ध आहे.
अ. सर्व साधारण रजा
एक. अर्जित रजा Earned leave दोन. अर्धवेतानी रजा Half pay leave तीन. परावर्तित रजा Commuted leave चार. अनअर्जित रजा – ना देय रज Leave not due पाच. असाधारण रजा Extraordinary leave
ब. विशेष रजा
एक.प्रसूती रजा Maternity leave दोन. विशेष विकलांग रजा Special disability leave तीन. रुग्णालयं रजा Hospitalization leave चार. खलाशांची रुग्णता रजा Siemens sickness leave पाच. क्षयरोग इत्यादीसाठी रजा T.B. leave सहा. अध्ययन रजा Study leave
अर्जित रजेची गणना Leave
अर्जित रजेची गणना ही दरवर्षाला सहा महिने मध्ये केल्या जाते पहिली सहामाही एक जानेवारीला व दुसरी सहामाही 1 जुलैला, प्रत्येकी पंधरा दिवस याप्रमाणे कॅलेंडर वर्षांमध्ये 30 दिवस आधी जमा होतील सदरची रजाही जानेवारी व जून महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक सहामाही कालावधीसाठी 15 दिवस अशी दोन हप्त्यामध्ये अर्जित रजा आगाऊ जमा करण्यात येते. अर्जित रजा ची मर्यादाही तीनशे दिवस आहे मात्र सहा महिन्याचे आरंभी 300 अधिक 15 अशी रजा दर्शविण्यात यावी व ती रजा 6 महीने संपेपर्यत जर उपभोगले नाही तर ती व्यपगत होईल तीनशे दिवसाची मर्यादाही 1 फेब्रुवारी 2001 पासून करण्यात आली आहे. कर्मचारी हा जेव्हा रूजू होतो तो महिना सोडून पुढील १ महिन्याला अडीच दिवस याप्रमाणे जमा करावे उदाहरणार्थ जर कर्मचारी हा 15 फेब्रुवारी 2021 ला रुजू झाला असेल तर फेब्रुवारी महिना सोडून मार्च, एप्रिल ,मे ,जून अशा चार महिन्याकरिता अडीच दिवस याप्रमाणे दहा दिवस अर्जित रजा जमा करावी व पुन्हा एक जुलै 2021 ला 10 अधिक 15 असे पंधरा दिवस सदर कर्मचाऱ्याचे खात्यावर अर्जित रजा जमा होईल व हीच पद्धत कर्मचाऱ्याने राजीनामा अथवा सेवानिवृत्ती अथवा मृत्यूमुळे सेवा समाप्त झाल्यास अर्जित रजेचे गणना करावी. याच प्रमाणे अर्ध वेतनी रजाही वरील प्रमाणेच परंतु ती प्रत्येक सहा महिन्याला दहा दिवस याप्रमाणे जमा करावी. १ महिन्याला 5/ दिवस याप्रमाणे जमा करावे
रजा रोखीकरण
रजा रोखीकरण हे रजा नियम 68 अन्वये कर्मचाऱ्याच्या खात्यावर शिल्लक असलेल्या रजेचे जास्तीत जास्त तीनशे दिवसाच्या अधीन राहून रोखीकरण केले जाऊ शकते यासाठी सूत्र हे अखेरचे वेतन + महागाई भत्ता x अर्जित रजा / 30 याप्रमाणे करावे. रजा रोखीकरण कर्मचाऱ्यास मृत व्यक्तीस लागू होते.
जर एखादा कर्मचारी सेवानिवृत्तीचे वेळी मुळ वेतन रूपये ५०,०००/- असेल तर त्याचे रजा रोखीकरण खालील प्रमाणे होईल.
50,000/-X300/30 =50000X10 = 5,00000/-X17%=85000/- =5,85,000/-
परंतु हाच कर्मचारी जर दिनांक 22/03/2021 रोजी मुत्यू पावला तर त्याचे रजा रोखीकरण खालील प्रमाणे होईल. महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 मधील नियम 69 नुसार सेवेत असताना मृत्यू झाल्यास रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम काढण्याकरिता सेवेत असताना शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास तो कर्मचारी मृत्यू पावला नसता आणि मृत्यूच्या तारखेच्या लगत नंतर त्याला देय अनुज्ञेय होणाऱ्या अजिर्त रजेवर गेला असता तर त्या मृत कर्मचाऱ्याला रजा वेतनाची जेवढे समजले रोख रक्कम मिळाली असती पण कोणत्याही परिस्थितीत 360 दिवसा बद्दलच्या रजा वेतनाहून अधिक होणार नाही इतके रोख रक्कम त्याच्या कुटुंबाला देण्यात येईल वयासोबत महागाई भक्ता मिळण्याचा हक्क असेल.
Month | Month Days | Current Month days | EL Balance | Basic | Month Amount |
March | 31 | 22 | 300 | 50000 | 35484 |
April | 30 | 30 | 278 | 50000 | |
May | 31 | 31 | 248 | 50000 | |
June | 30 | 30 | 217 | 50000 | |
July | 31 | 31 | 187 | 50000 | |
August | 31 | 31 | 156 | 50000 | |
September | 30 | 30 | 125 | 50000 | |
October | 31 | 31 | 95 | 50000 | |
November | 30 | 30 | 64 | 50000 | |
December | 31 | 31 | 34 | 50000 | |
January | 31 | 31 | 3 | 4839 | |
490323 | |||||
300 | D.A. | 17% | 83355 | ||
Total | 573678 |
जर सेवानिवृत्त कर्मचारी व मय्यत कर्मचारी यांचे शेवटचे वेतन सारखेच असेल तर मग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास रूपये 5,85,000/- मिळते व मय्यत कर्मचाऱ्यांचे वारसांना रूपये 5,73,678/- एवढी येत असुन रूपये 11,322/- ईतकी रक्कम मय्यत कर्मचाऱ्याचे कुटूंबियांना कमी मिळत आहे. तर याचे काय कारण आहे असे आपणास वाटत असेल तर या ठिकाणी ३१ दिवसाचे ६ महीने मध्यंतरी आल्यामुळे ६ दिवसाचे अर्जित रजा रक्कम कमी मिळत आहे.
50000X6/31=9677/-
9677X17%= 1645/- 9677+1645=11,322/-
मय्यत कर्मचाऱ्याचे रजा रोखीकरण व बिल कसे तयार या बाबतची EXCEL SHEET श्री भारतीय यांनी तयार केली असुन सदरची शिट ची लिंक करिता येथे क्लिक करावे.
राजीनामा
एखादा कर्मचारी यांनी सेवेचा राजीनामा दिला असेल किंवा सेवा सोडली असेल तर त्याच्या खात्यावर शिल्लक असलेल्या एकूण अर्जित रजे पैकी अर्ध्या रजेचे रोखीकरण त्याच मिळू शकेल व ही मर्यादा 150 दिवसापेक्षा अधिक असणार नाही याचा अर्थ तीनशे दिवसाचे नियम ही मर्यादा याठिकाणी दिलेली आहे. रजा रोखीकरण हे मात्र ज्या कर्मचाऱ्यास सेवेतून काढून टाकण्यात येते किंवा बडतर्फ करण्यात येते अशा कर्मचाऱ्यास रजा रोखीकरण करण्याचा फायदा मुळीच मिळत नाही. रजा रोखीकरण कसे करावे या बाबतचा व्हिडीओ तयार केला असुन ते पाहण्याकरीता येथे क्लिक करावे तसेच देयक कसे तयार करावे या करीता येथे क्लिक करावे.
अनर्जित – नादेय रजा
अनर्जित – नादेय रजा लिव्ह नॉट due रजा नियम 62 नुसार अनर्जित रजा कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना म्हणजेच ज्यांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले आहे असे कर्मचारी यांना अर्धवेतन रजेच्या खात्यावरून आगाऊ मंजूर करता येते अशी रजा संपल्यानंतर कर्मचारी कामावर परत हजर होण्याची सक्षम प्राधिकारी खात्री असली पाहिजे . तसेच कर्मचारी कामावर परत हजर झाल्यानंतर जेवढे दिवस त्याने अनर्जित रजा घेतली असेल तेवढे दिवस रजा अर्धवेतन रजेच्या खात्यावर नंतर तो मिळवेल याची देखील अधिकाऱ्यास खात्री असली पाहिजे तरच ही रजा मंजूर करता येते. याठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया एक कर्मचारी शंभर दिवस रजेवर होता त्याच्या खात्यामध्ये 20 दिवस अर्जित रजा, 70 दिवस अर्धा वेतनी रजा शिल्लक आहे अशा वेळेस उर्वरित रजा ही त्या कर्मचाऱ्याने अन अर्जित रजा मंजूर करा म्हणून कार्यालयास अर्ज सादर केला आहे त्या वेळेस कसे करावे हे पाहूया. दिनांक 01/02/2020 ते 10/05/2020 या कालावधीत एक कर्मचारी वैद्यकिय कारणास्तव रजेवर होता त्यामध्ये त्यानी दिनांक 01/02/2020 ते 20/02/2020 पर्यत 20 दिवस अर्जित रजा वैद्यकिय कारणास्तव व दिनांक 21/02/2020 ते 26/03/2020 35 दिवस परावर्तीत रजा अर्धवेतनी रजा 70 दिवस व दिनांक 27/03/2020 ते 10/05/2020 पर्यत 45 दिवस परावर्तीत 90 दिवस अनर्जित रजा त्यामुळे सदर कर्मचाऱ्यास 90 दिवस अर्जित करण्याकरीता एका वर्षास 20 दिवस या प्रमाणे त्यास 4 वर्ष 6 महीने पुढे सेवा करत असेल तर त्यास अनर्जित रजा मंजुर करता येईल.
या ठिकाणी रजेचा हिशेब कसा करावा या बाबत खालील प्रमाणे माहीती तयार करावी.
- दिनांक 01/02/2020 ते 29/02/2020 = 29 दिवस
- दिनांक 01/03/2020 ते 31/03/2020 = 31 दिवस
- दिनांक 01/04/2020 ते 30/04/2020 = 30 दिवस
- दिनांक 01/05/2020 ते 10/05/2020 = 10 दिवस
- दिनांक 01/02/2020 ते 20/02/2020 = 20 दिवस अर्जित रजा
- दिनांक 21/02/2020 ते 29/02/2020 = 9 दिवस परावर्तीत रजा अर्धवेतनी रजा 18 दिवस
- दिनांक 01/03/2020 ते 26/03/2020 = 26 दिवस परावर्तीत रजा अर्धवेतनी रजा 52 दिवस (18+52=70)
- दिनांक 27/03/2020 ते 31/03/2020 = 5 दिवस अर्धवेतनी अनर्जित रजा 10 दिवस
- दिनांक 01/04/2020 ते 30/04/2020 = 30 दिवस अर्धवेतनी अनर्जित रजा 60 दिवस
- दिनांक 01/05/2020 ते 10/05/2020 = 10 दिवस अर्धवेतनी अनर्जित रजा 20 दिवस (10+60+20=90)
सेवापुस्तकात नोंद कशी घ्यावी या बाबतचा फोटो दिला असुन त्या प्रमाणे नोंद घ्यावी. जेव्हा सदर कर्मचारी परत आल्यानंतर चार वर्ष सहा महिने सेवेत राहण्याची खात्री असली पाहिजे जेव्हा अशी अर्धवेतनी रजा त्याच्या खात्यावर जमा होईल तेव्हाच त्याने घेतलेली अन अर्जित रजा त्यात समायोजित होईल अनर्जित रजेवर असताना त्या कर्मचारी राजीनामा दिला किंवा तो स्वेच्छेने सेवानिवृत्त झाल्यास त्यास देण्यात आलेल्या रजा वेतन त्याच्याकडून वसूल केले जाईल मात्र रुग्ण अवस्थेमुळे असे घडल्यास त्याच्याकडून वेतनाची वसुली करण्यात येणार नाही अनर्जित रजाही वैद्यकीय कारणास्तव तीनशे दिवस अन्य कारणास्तव 90 दिवस व सर्व मिळून 180 दिवस वैद्यकीय कारणास्तव जास्तीत जास्त रजा मिळू शकते. रजे बाबत शासन निर्णय करीता येथे क्लिक करावे. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा प्रशिक्षण केंद्र पुणे यांचे रजेबाबत पावर पॉइंट प्रेझेंटेशन तसेच यशदा यांचे पावर पॉइंट प्रेझेंटेशन करिता या ठिकाणी क्लिक करावे या पुढे असाधारण रजा, प्रसुती रजा, अध्ययन रजा व निवृत्ती पुर्व रजा या बाबत सांगण्यात येईल.