Registered Payee
आहरण व संवितरण अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी कंत्राटदार पुरवठादार निवृत्तीवेतनधारक इतर शासकीय कार्यालय यांची बीन्स प्रणाली Registered Payee मध्ये रजिस्टर म्हणून नोंदणी करावयाची कार्यपद्धत
आहरण व संवितरण अधिकारी (DDO), कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी (EMPLOYEE), कंत्राटदार पुरवठादार (Vendor) व निवृत्तीवेतनधारक(Pensioner) यांची बीन्स प्रणाली Registered Payee मध्ये रजिस्टर म्हणून नोंदणी करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोश या संकेतस्थळावर जाऊन त्यांचे बीन्स प्रणाली मध्ये (DDO) फायनल पासवर्ड वापरून लॉग इन करावे.
Maintenance Payee
आहरण व संवितरण अधिकाऱ्यास नोंदणी करण्यासाठी PAYEE REGISTRATION चे आवेदन पत्र स्क्रीनवर दिसेल सदर आवेदन पत्रा मध्ये Type of Payee वर क्लिक करून अवेदन पत्रा मध्ये आहरण व संवितरण अधिकारी यांची आवश्यक ती माहिती भरावी
कार्यालर्याचे City/Town, Pin Code, Email ID तसेच आहरण व संवितरण अधिकाऱ्याच्या टेलिफोन मोबाईल नंबर Telephone
/Mobile Number बँकेचा संपूर्ण तपशील नोंद असे IFSC code, MICR, Bank, Branch, Account
number नंबर खाते क्रमांक पूर्वी कोणत्याही प्रकारे शब्द जसे एसबी वापरू नये अकाउंट टाईप इत्यादी प्रकारचा तपशील भरावा
इतर प्रकारचे पी उदाहरणार्थ पुरवठादार, कंत्राटदार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, इतर शासकीय कार्यालयांना नोंदणीकृत रजिस्टर Registered करायचे असल्यास Type of Payee समोर संबंधित टाईप निवडावा व त्यानंतर त्याची माहिती भरावी
वर्ड व्हेरिफिकेशन Word Verification या टॅबखाली प्रणाली निर्मिती Captcha स्वरूपात उपलब्ध झालेला चार अंकी कोड नमूद करून सबमिट यावर क्लिक करावे.
Successfully submit असा संदेश आल्यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्या आवेदन पत्रा ची प्रिंट काढून त्या आवेदन पत्र सोबत संबंधित कार्यालयाचे कव्हरिंग लेटर व संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्याच्या बँक खात्याच्या रद्द केलेल्या धनादेशाचे प्रकार Cancelled Cheque तसेच इतर प्रकारचे PAYEE रजिस्टर करायचे असल्यास त्यांच्या बँक खात्याचां रद्द केलेल्या धनादेशाची प्रत जोडून संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयांमध्ये जाऊन संबंधित प्राधिकार यांचेकडून सिस्टीम मध्ये Approve करून घ्यावे
आवेदन पत्र फॉर्म संबंधित जिल्हा कोषागार अथवा अधिदान व लेखा कार्यालय यांनी Approve करण्यापूर्वी आवेदन पत्र रPayee Registration Form बदल करता येतो आवेदन पत्रा बदल करण्यासाठी रिपोर्ट Registered Payee अंतर्गत Non Approved वर क्लिक करावे व Modify या TAB क्लिक करून ते बदल करावेत त्यानंतर सदर लिंक वर क्लिक करावे
इतर PAYEE उदाहरणार्थ पुरवठादार, कंत्राटदार, कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक इतर शासकीय कार्यालय यांना नोंदणीकृत Registered करण्यासाठी Type of Payee समोर संबंधित टॅब निवडावा व त्याची माहिती भरावी त्यानंतर सबमिट यावर क्लिक करावे.