सुधारित अंशराशीकरणाबाबतची माहीती

सध्या अंशराशीकरण बाबत प्रसार माध्यमावर बऱ्याच मोठया प्रमाणात चर्चा चालु आहे की, काही राज्यात पेन्शन विक्री ही १५ वर्षावरून १० वर्ष कोठे ११ वर्ष करण्यात आली.  त्या अनुषंगाने मी आपणास खालील प्रमाणे माहीती पुरवित आहे, त्या नुसार निवृत्तीवेतन धारकांनी जागृत होऊन त्या नुसार आपणास कसा फायदा होईल या दृष्टीकोणातुन विचार करावा व त्या नुसार शासनास निवेदन द्यावे तसेच आपली संघटना असेल त्यांचे मार्फत शासनाशी पाठपुरावा करून आपली मागणी करावी.

सर्व मुद्दे पाहू या.

आपले जे शेवटचे अंतिम वेतन आहे त्याचे 50% हे निवृत्तीवेतन असते, व या निवृत्तीवेतनाचे 0% ते 40% ही विकतो.  समजा 50000 हजार रूपये शेवटचे बेसिक आहे.  तर त्याचे निवृत्तीवेतन हे 25000/- होईल ते जेव्हा आपण 0% ते 40% विक्री करून तेव्हा आपण समजा 40% विक्री केली तर ती 10000 होते.  व या 10000/- ला 8.371 नी गुणले तर ती रक्कम ही 1004520/- अंशराशीकरणाची होते व ती १५ वर्षात म्हणजेच 180 महीन्यात कपात करावयाची असते. व त्याचा हप्ता हा जी रक्कम 40% ची आली तीच असते.

50000/2=25000

निवृत्तीवेतन =25000/-

40% विक्री 25000X40%=  10000/-

अंशराशीकरणाचा वयानुसार (५८ वर्ष )फॅक्टर 8.371

 

10000X8.371=1004520/- एवढी रक्कम ही आपणास अंशराशीकरण पेन्शन विक्रीची मिळते व ती 180 महीन्यात परतफेड करावी लागते. मुद्दलची परतफेड ही 100 किंवा 101 हप्त्यात पुर्ण होते व पुढी 80 हप्त्यात व्याजाची परतफेड होते.

180X10000=1800000/- एवढी रक्कम आपण परतफेड करतो म्हणजेच आपण त्यावरील व्याज हे रूपये

1800000-1004520= 795480 एवढे देतो.  ही झाली अंशराशीकरणाबाबतची माहीती हे आपण माहीत आहे व आपण मनात विचार सुद्धा केला असेल की हे आम्हाला काय सांगतो हे मला माहीत आहे, असो आता या मध्ये काय असावे हे पाहू.

 

जर अंशराशीकरण हे आपणास घर बांधणी अग्रिमाची जी प्रचलीत पद्धतीनुसार शासन देते त्या नुसार जरी आपणास एकुण १५ वर्षात मुद्दल व व्याजाची वसुली होईल असे केले तर कसा फायदा होतो ते सांगतो. घर बांधणी व्याजाचे सुत्र खालील प्रमाणे आहे.

100  =  हप्ते 10000 = मासिक कपात 7.90% व्याज
100*(100+1)/2 10000/12 7.90/100
5050 833.33333 0.079 = 332458

घरबांधणी व्याजाचे सुत्रानुसार 332458/- एवढे व्याज होते.  त्यामुळे जर अंशराशीकरणा करीता घर बांधणी च्या व्याजानुसार जर आकारणी केली तरी फायदेशीर होईल जसे की,

अंशराशीकरणाची रक्कम रूपये 1004520/- त्यावरील घरबांधणी प्रमाणे व्याज रूपये  332458/- एकुण रूपये 1336978/- होईल व याची कपात दोन प्रकारे करता येईल जसे की पहीला प्रकार

1336978/180=7427/- आधीचे व्याज दरानुसार हे 10000-7427= 2573/- रूपये 2573/- (25.73%) एवढी दरमहा बचत होईल.

किंवा दुसरा प्रकार

1336978/10000=133 महीने म्हणजेच ११ वर्षात ही कपात पुर्ण होईल.  या करीता चाकोरीबाहेरील प्रयत्न न करता शासनास घरबांधणी व्याजानुसार अंशराशीकरणावर व्याज लावण्याची रितसर मार्गाने सर्व निवृत्तवेतन धारकांनी विनंती करावी अशी माझी आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे. 

धन्यवाद!

आपला हितचिंतक

 

प्रमोद महादेव पुरी

शासकिय कर्मचारी सेवार्थ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *