वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीवर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नती

वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नती बाबत खुशखबर!!! 

कनिष्ठ लिपीक या पदाची सरळसेवा भरती करीता शासनाच्या दोन अधिसूचना होत्या त्या पैकी एक ही बृहन्मुंबईतील शासकिय कार्यालयातील कनिष्ठ लिपीक व दुसरे बृहन्मुंबईबाहेरील शासकिय कार्यालयातील कनिष्ठ लिपीक असे दोन सेवा प्रवेश नियम होते ते अधिसूचना दिनां 01/11/2022 नुसार अधिक्रमण करण्यात आले आहे.

अधिसूचना दिनांक 6.6.2017 बृहन्मुंबईबाहेरील हा शब्द वगळण्यात आला आहे  तसेच बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक गट-क (सेवाप्रवेश) नियम २०१८ हा अधिक्रमीत केला त्यामुळे आता बृहन्मुंबईतील किंवा बृहन्मुंबईबाहेरील असा फरक राहीला नसुन फक्त आता हे सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवड झालेल्या व्यक्तिमधून सेवेत दाखल होईल जसे आतापर्यंत वर्ग ब व वर्ग अ यांची निवड होत होती त्या नुसार या पुढे कनिष्ठ लिपीक यांची निवड होईल.

लिपिक टंकलेखक गट क सेवाप्रवेश नियम. 2017 या मधील नियम ३ (क) नुसार गट ड मधील पदा धारण करणाऱ्या व गट ड मधील पदावर किमान तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी नियमित सेवा पुर्ण केलेल्या व खंड (ख) त्या उपखंड दोन नुसार पदवी धारण केली आहे असा होता तो या अधिसूचने नुसार ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली असुन ज्यांनी मराठी ३० किंवा इंग्रजी ४० उत्तीर्ण केली अशा पात्र गट ड मधील कर्मचाऱ्यास 1/11/2022 चे अधिसूचनेपासुन ५ वर्षाकरीता म्हणजेच दिनांक 1/11/2027 पुर्वी 10 वी उत्तीर्ण गट ड मधील कर्मचाऱ्यांची पदोन्नती होईल.

बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक, गट-क (सेवाप्रवेश)(सुधारणा) नियम, 2022

अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग, दिनांक 01/11/2022

शासन निर्णयाकरीता यावर क्लिक करावी

बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक, गट-क (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम 2019

शासन निर्णयाकरीता यावर क्लिक करावी

बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक गट-क (सेवाप्रवेश) नियम २०१८

शासन निर्णयाकरीता यावर क्लिक करावी

लिपिक टंकलेखक या पदाचे सेवाप्रवेश नियम. 2017

शासन निर्णयाकरीता यावर क्लिक करावी

गट ड पदाचे सेवा प्रवेश नियम 2017

शासन निर्णयाकरीता यावर क्लिक करावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *