departmental examsविभागीय परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास संधी सूट वेतनवाढ रोखणे पदोन्नतीसाठी ज्येष्ठता गमावणे याबाबतची माहिती

Table of Contents

Departmental Exams विभागीय परीक्षा

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, दिनांक 31 मार्च 2021 नुसार राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांच्या विभागीय परीक्षेतील सामाईक धोरण बाबतचा शासन निर्णय असून या शासन निर्णयामुळे जोपर्यंत कर्मचारी हा Departmental Exams विभागीय परीक्षा उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत त्याला देण्यात येणारी वेतन वाढ ही रोखून धरावी तसेच रोखलेली वेतनवाढ केव्हा मुक्त करावी  विभागीय परीक्षांना एकूण संधी किती त्याच्या व्याख्या व उत्तीर्ण होण्यापासून वयोमर्यादा याबाबत आपण यामध्ये अभ्यास करूया!

सदर चे शासन निर्णय हे फक्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, मंडळे, महामंडळे अन्य निमशासकीय आस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनाही लागू राहणार नाही हे प्रामुख्याने याठिकाणी लक्षात घ्यावे. त्यांचे करिता त्यांचे विभागाने त्यानुसार वेगवेगळे शासन निर्णय काढलेले आहे त्यामुळे त्यांनी आपल्या विभागाच्या शासन निर्णयानुसार कारवाई करावी. ही फक्त राज्य शासकीय कर्मचारी यांचे करिताच आहे

विभागीय परीक्षा देण्यामागचा एक प्रमुख उद्देश…

Departmental Exams विभागीय परीक्षा देण्यामागचा एक प्रमुख उद्देश आहे की, शासकीय कर्मचाऱ्यास शासकीय कामकाजाचे ज्ञान प्राप्त झाले आहे किंवा नाही याकरिता विभागीय परीक्षा आयोजित करण्यात येते त्यामुळे सदरच्या विभागीय परीक्षा मध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे विभागीय परीक्षा व अर्हताकारी परीक्षा यामध्ये असा एक भेद आहे की, विभागीय परीक्षा ला सुट्ट दिली जाते परंतु अर्हताकारी  परीक्षेला कोणत्याही प्रकारची सूट दिल्या जात नाही.  ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यकच आहे.

Departmental Exams विभागीय परीक्षा संधी

विभागीय परीक्षेला बसण्याकरिता संधी दिली जाते ती संधीची कशी गणना करावी व किती संधीमध्ये विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे तर यामध्ये एकूण तीन संधी चार वर्षांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

संधीची गणना करताना जेव्हा कर्मचारी शासकीय सेवेत रुजू होतो व रुजू झाल्यानंतर विभागीय परीक्षेला तो अर्ज भरण्याचा पात्र होत असेल तर ती पहिली संधी व पुढील दोन संध्या पुढील येणाऱ्या परीक्षेच्या धरल्या जाते यामध्ये त्या कर्मचाऱ्याने परीक्षेला बसण्याकरता अर्ज केला असो अथवा नसो ती संधी पकडल्या जाईल त्यामुळे जो कर्मचारी अंदाजे जून च्या पूर्वी नियुक्त होतो व परीक्षा सप्टेंबर मध्ये होत असेल तर तर त्याला अर्ज करता येते व त्यांनी जर अर्ज केला नाही तर एक संधी जाऊ शकते, याकरिता यामध्ये कर्मचाऱ्याने प्रामुख्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

मी नवीन आहे, मला याची कल्पना नव्हती व मला कार्यालयाने सांगितले नाही असा बहाणा कृपया करून हे सुरुवातीला समजून घ्यावे, त्यामुळे भविष्यात त्रास होणार नाही, आपण नियुक्त झालेले असाल तेव्हाच परीक्षा अर्ज भरण्यासंबंधी कार्यवाही सुरू झाली असेल तर आपण अर्ज भरावा आपला अर्ज जर कार्यालयाने स्वीकारला नाही तर आपली संधी जाणार नाही.

म्हणजे याचा अर्थ असा की, त्या वर्षांमध्ये विभागीय परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपली नसेल तर आपली संधी ची गणना होईल मुदत संपली असेल तर संधी म्हणून देण्यात येणार नाही.

वेतनवाढ

Departmental Exams विभागीय परीक्षा विहीत संधीत उत्तीर्ण न झाल्यास संबंधितांची वेतनवाढ रोखण्यात येईल म्हणजेच आपल्याला सुरुवातीचे तीन वेतनवाढी मिळेल व त्यानंतर  वेतनवाढी जोपर्यंत परीक्षा पास होणार नाही तोपर्यंत वेतनवाढ मिळणार नाही व जेव्हा परीक्षा उत्तीर्ण व्हाल तेव्हा सर्व वेतनवाढी आपल्या मुक्त करण्यात येईल, जणू काही आपल्या वेतनवाढी रोखल्यास नाही याप्रमाणे दिल्या जाईल, परंतु यामध्ये थकबाकी रक्कम आपल्याला देता येणार नाही – मिळणार नाही.  कर्मचारी उत्तीर्ण झाले नसेल, त्यांना कार्यालयाने वेतनवाढी बंद केल्या नसेल तर जेव्हा लक्षात येईल तेव्हा त्यांची वसुली करण्यात येईल,

तीन संधी नंतर व वेतनवाढ थांबवील्यानंतर मग संधी ची आवश्यकता नाही जोपर्यंत परीक्षा उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत आपण परीक्षेला बसू शकता.

परंतु जे गट अ व गट ब चे राजपत्रित अधिकारी आहेत त्यांना परिविक्षाधीन कालावधी लागू असल्यामुळे त्यांना परिविक्षाधीन कालावधी च्या दरम्यान विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे त्यांना अमर्यादा संधी मिळणार नाही तसेच गट क ला सुद्धा याच प्रमाणे जर परिक्षाविधीन कालावधी असेल तर त्यांना सुद्ध परिविक्षाधिन कालावधीमध्ये उत्तीर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा परिविक्षाधिन कालावधी असेलल्या अधिकारी कर्मचाऱ्यास विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांना सेवेतून सेवामुक्त करण्यात येईल.

सदरची वेतनवाढ परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे रोखून धरली असली तर, त्यांना सदर पदावर पंधरा वर्षे सेवा पूर्ण केल्याचा दिनांक किंवा त्यांनी वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्याचा दिनांक यामध्ये जे नंतर घडेल ती दिनांक हि विभागीय परीक्षेतून उत्तीर्ण होण्यापासून सूट ची जाईल याचाच अर्थ, आपल्याला 15 वर्षापैकी बारा वर्षे वेतनवाढ मिळणार नाही बारा वर्ष एकाच वेतन श्रेणी मध्ये एकाच बेसिक वर राहावे लागेल त्यामुळे विभागीय परीक्षा लवकर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे,

एखादा कर्मचारी वयाच्या चाळीसाव्या वर्षी सेवेत रुजू झाला असेल तर त्याला पन्नास यावर्षी सूट मिळणार नाही, तर त्याला सुटही वयाच्या 55 वर्षी मिळेल त्यामुळे आपणास सूट मिळेल या आशेवर राहून नये.  विभागीय परीक्षा उत्तीर्ण व्हावेच.

उत्तीर्ण होण्यापासून सूट

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 1 मार्च 2018 मधील बाब क्रमांक 2 नुसार पदोन्नतीसाठी ची Departmental Exams विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळण्याकरता कर्मचाऱ्याने त्या पदावर किमान पंधरा वर्षे सेवा करणे अनिवार्य राहील त्यामुळे संबंधित पदावर कर्मचाऱ्याची पंधरा वर्षे सेवा पूर्ण झाल्याचां दिनांक किंवा त्याच्या वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्याचा दिनांक यापैकी जे नंतर घडेल त्यानंतर लगतचा दिनांक हा कर्मचाऱ्यास पदोन्नतीसाठी विहीत केलेली परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याचा दिनांक समजण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

ज्या दिवशी आपण परीक्षेचा शेवटचा पेपर देतो त्यानंतरच्या पुढील दिनांकापासून आपण उत्तीर्ण झाले असे समजण्यात येईल मग तो निकाल केव्हाही लागो समजा, आपण 25 मार्च 2019 ला शेवटचा पेपर दिला असेल व आपला निकाल उत्तीर्ण म्हणून दिनांक 9 एप्रिल 2021 लागला असेल तर आपण विभागीय परीक्षा ही दिनांक 26 मार्च 2019 ला उत्तीर्ण झाले असे समजण्यात येईल.

परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधीही प्रत्येक पदाच्या सेवाप्रवेश नियम मध्ये दिलेली असते ज्यामध्ये नियुक्तीच्या दिनांकापासून चार वर्षात तीन संधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे अशी अट असते. या करिता नवीन रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रथम हे लक्षात घ्यावी की त्यांच्या विभागामार्फत विभागीय परीक्षा केव्हा घेतल्या जाते याबाबतची माहिती सर्वप्रथम घ्यावी.

चार वर्षात तीन संधी

या ठिकाणी आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत असेल की, चार वर्षात तीन संधी हे काय समीकरण असेल तर या अनुषंगाने आपणास सांगू इच्छितो की, जर एखादा कर्मचारी जानेवारी महिन्यात लागला व दुसरा कर्मचारी हा ऑक्टोंबर मध्ये लागला तर दोन्ही कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा दिनांक एकच वर्षातील असला तरी नियुक्ती दिनांक हा वेगवेगळे आहे.

त्यामुळे जर परीक्षा ही ऑक्टोंबर महिन्यात घेण्यात येत असेल तर पहिला कर्मचारी अर्ज भरण्यास पात्र राहील व दुसऱ्या कर्मचारी अपात्र त्याच्यामुळे या ठिकाणी पहिला कर्मचारी हा चार वर्षांमध्ये चार संधी घेईल तर दुसरा कर्मचारी हा चार वर्षांमध्ये तीन संधी घेईल, त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये व सर्व उमेदवारांना समान संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने परीक्षा आयोजन ही संधी म्हणून देण्यात आली असून चार वर्षात तीन संधीची तरतूद परीक्षा नियमावलीत करण्यात आली आहे.

जर कर्मचारी परीक्षेला बसण्यास पात्र असून जर त्यावर्षी उमेदवाराने परीक्षेचा अर्ज सादर केला नाही किंवा अर्ज सादर करून परीक्षेस अनुपस्थित राहिला तरी त्या वर्षी आयोजित होणारी परीक्षा ही तीन संधी वरील एक संधी म्हणून देण्यात येईल. परंतु जर परीक्षा झाली नाही तर तर ती संधी होणार नाही.

ज्येष्ठता यादी

तसेच ज्येष्ठता यादी ही विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची लावायला हवी, जोपर्यंत तो विभागीय परीक्षा उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत त्याचे नाव जेष्ठता यादी मध्ये समाविष्ट करणे योग्य होणार नाही, कारण तो Departmental Exams विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे पदोन्नतीस सुद्धा पात्र नसतो व कायमपणाचे प्रमाणपत्र मिळण्या सुद्धा पात्र नसतो, त्यामुळे ज्या तारखेला परीक्षा उत्तीर्ण होईल त्याच तारखेला तो सेवाजेष्ठता मध्ये समाविष्ट होईल व त्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या कर्मचारी जर त्याच्या आधीच विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर तो पदोन्नतीच्या जेष्ठते मध्ये सदर कर्मचाऱ्यास वरिष्ठ होईल व तो पदोन्नती विभागीय परीक्षा उशिरा उत्तीर्ण झाल्याच्या कर्मचाऱ्यांच्या आधी पदोन्नती होईल.

विभागीय परीक्षा संदर्भातील शासन निर्णय खाली दिले असुन त्या प्रमाणे कार्यवाही करावी.

Common Policy of Departmental Exams for Various Administrative Departments.राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांच्या विभागीय परीक्षांसंदर्भातील सामाईक बाबींबाबतचे धोरण.G.R. Date 31/03/2021

Arrange the Departmental Examination by concern administrative Department. विभागीय परीक्षांचे आयोजन प्रशासकीय विभागांनी करण्याबाबत

Resolution for amendment in provision of giving concession to candidate from passing the PRT/Departmental Examination due to over aged.सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा/विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यासंदर्भातील तरतूदीमध्ये सुधारणा करण्याबाबत

सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा/विभागीय परीक्षेच्या संधीची गणना करणेबाबत.

सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा / विभागीय परीक्षा उत्तीर्ण सूट देण्यासंदर्भात लक्षात घ्यावयाच्या बाबी