eVetanSeva New Sevaarth
नवीन सेवार्थ प्रणाली (eVetanSeva)
Table of Contents
१. पहिला टप्पा: जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये आवश्यक माहिती अद्ययावत करणे
नवीन प्रणालीत डेटा मायग्रेट (Migrate) करण्यापूर्वी जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये खालील दुरुस्त्या व तपासणी पूर्ण करणे आवश्यक आहे:
1.चुकीची माहिती अद्ययावत करणे (Incorrect Data Cleaning):
*Path: `Worklist > Payroll > Utility for Incorrect Data Cleaning`
कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांची माहिती तपासून ज्यांची माहिती अपूर्ण आहे किंवा दुरुस्ती करायची आहे, ती योग्य पर्यायांचा वापर करून अद्ययावत करावी.
2. कर्मचारी रिपोर्टची पडताळणी (Sorted Data Report):
Path: `Reports > Payroll > Employee Sorted Data Report`
डेटा अपडेट केल्यानंतर हा रिपोर्ट तपासावा. काही माहिती अपडेट करायची शिल्लक असल्यास संचालनालयास ई-मेल (`sevaarth-dat@mah.gov.in`) करून अद्ययावत करून घ्यावी.
3. कर्मचारी सांख्यिकी तपासणी (Employee Statistics):
Path:`Reports > Payroll > Other > Employee Statistics`
* या रिपोर्टमधील माहिती तपासून दुरुस्ती असल्यास ‘Changes’ टॅबमधून किंवा ई-मेलद्वारे अद्ययावत करून घ्यावी.
4. मंजूर पदांचा ताळमेळ (Entry of Posts):
Path: `Worklist > Payroll > DDO Profile > Entry of Posts`
मंजूर आकृतीबंधानुसार स्थायी/अस्थायी पदे योग्य भरली आहेत का याची खात्री करावी. मुख्य कार्यालय व अधिनस्त कार्यालयानुसार पदांची तपासणी करावी (शक्य असल्यास या स्क्रीनची प्रिंट काढून ठेवावी).
5. कर्मचाऱ्यांना बिल ग्रुपमध्ये समाविष्ट करणे:
Path: `Worklist > Payroll > DDO Profile > Attach Employee to Bill Group`
कार्यालयातील सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या योजनेनुसार (Scheme) योग्य त्या बिल ग्रुपमध्ये समाविष्ट (Attach) करावे.
6. कर्ज व अग्रीम तपशील (Loan Details):
Path: `Worklist > Payroll > Employee Information > Employee Loan Details`
भरलेल्या कर्जाच्या माहितीची स्क्रीन प्रिंट काढून ठेवावी किंवा स्वतंत्र नोंद ठेवावी.
7. शासकीय निवासस्थान तपशील (Govt. Accommodation):
Path: `Worklist > Payroll > Employee Information > Govt. Accommodation`
नोंदवलेल्या माहितीची स्क्रीन प्रिंट किंवा स्वतंत्र नोंद ठेवून खात्री करावी.
> टीप: वरील सर्व कामकाज पूर्ण झाल्यानंतरच आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचा (DDO) डेटा नवीन प्रणालीत मायग्रेट केला जाईल.
२. दुसरा टप्पा: डेटा मायग्रेशन (Data Migration) व पडताळणी
जुन्या प्रणालीतील माहिती API द्वारे नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये मायग्रेट केली जाईल. खालील १२ प्रमुख मुद्द्यांची नवीन प्रणालीत पडताळणी करणे आवश्यक आहे:
१ GR Master ज्या शासन निर्णयांतर्गत पदे उपलब्ध आहेत व वेतन देयके काढली जातात, तेच GR नवीन प्रणालीत दिसतील.
२ DDO Schemes सर्व Scheme Codes ची माहिती API द्वारे प्राप्त होईल, ती तपासावी.
3.Bill Groups जुन्या प्रणालीतील सर्व बिल ग्रुप्स प्राप्त होतील, त्यांची पडताळणी करावी.
४. Permanent Post भरलेली व रिक्त असलेली सर्व स्थायी पदे तपासावीत.
५. Temporary Post भरलेली व रिक्त असलेली सर्व अस्थायी पदे तपासावीत.
६. Employee DATA केवळ ‘Incorrect Data Cleaning’ मध्ये पूर्ण भरलेला कर्मचारी डेटाच नवीन प्रणालीत येईल.
७. DDO Wise NG Recoveries अशासकीय वजातींचे (Non-Govt. Recoveries) पर्याय तपासावेत.
८. Employee wise NG Recovery कर्मचाऱ्यांच्या अशासकीय वसुलीचा तपशील तपासावा.
९. Address Field कर्मचाऱ्यांचा पत्ता तपासून आवश्यक तिथे दुरुस्ती करून अंतिम करावा.
१०. Nominee Details DCPS/NPS चे नामनिर्देशन तपासावे व कुटुंबाचा तपशील नवीन प्रणालीत भरावा.
११.Government Accommodation शासकीय निवासस्थानाचा तपशील तपासून अंतिम करावा.
१२. Loan Sanctioned & Recovery मंजूर शासकीय कर्जे व त्यांच्या वसुलीचा तपशील तपासून अंतिम करावा.
Word File