आतापर्यंत सेवार्थ प्रणाली मध्ये बिल ग्रुप डिलीट करण्याची सुविधा नव्हती
परंतु आता Pay Bill Group मेंटेनन्स मध्ये जीपीएफ व डीसीपीएस असे दोन भाग केल्यामुळे त्यामध्ये आपल्याला आता आधीचे Pay Bill Group जे अनावश्यक होते ते आता आपल्याला तेथून कमी करता येईल व काही निवडक Pay Bill Group ठेवता येईल.
त्याकरिता आपण सर्वप्रथम असिस्टंट मधून लॉग इन होऊन पॅरोल मध्ये जाऊन व्हिडिओ प्रोफाइल या टॅब वर जाऊन त्या ठिकाणी Pay Bill Group मेंटेनन्स मध्ये जाऊन त्या ठिकाणी सहा प्रकारचे टॅब दिले असून त्यामध्ये तीन प्रकारे विभागणी केली.
पहिल्या भागामध्ये जीपीएफ
दुसर्या भागामध्ये डीसीपीएस
व तिसऱ्या भागांमध्ये बिल ग्रुप दिले आहे त्यामध्ये पहिलं रेगुलर व दुसरं सप्लीमेंट्री आपणास प्रथम जीपीएफ रेगुलर बिल ग्रुप मेंटेनन्स मध्ये जाऊनत्यावर क्लिक करावे
त्यानंतर आपणास आतापर्यंत जेवढी Pay Bill Group तयार केले असेल ते दिसेल त्यामधील एका Pay Bill Group ला सिलेक्ट करून खाली सेव डिलीट बॅक असे ऑप्शन दिले असून त्यामध्ये डिलीट ऑप्शन निवडावे व आपले Pay Bill Group या ठिकाणी डिलीट होईल