End Service in Sevaarth

End Service in Sevaarth

सेवार्थ मधील सेवा एन्ड कशी करावी?

तसेच एका विभागातुन दुसऱ्या विभागात नव्याने रूजु झाले असतांना काय कार्यवाही करावी?

एखादया कर्मचारी-अधिकारी यांचे सेवा End  केली असता काय करावे.

किंवा कर्मचारी यांनी विभागाची परवानगी न घेता वरिष्ठ पदाची किंवा इतर पदाची परीक्षा दिली असता ते जर दुसऱ्या विभागात रूजु झाले असेल किंवा होणार असेत तर काय करावे?

Transfer to other Treasury

जेव्हा कर्मचारी हा कार्यालयाची परवानगी न घेता परीक्षा पास होवून ईतर विभागात किंवा आपलेच विभागात जातो तेव्हा बरेचसे कार्यालय हे त्यांची सेवा एंन्ड करतात परंतु हे योग्य नाही, सेवा न संपविता End Service in Sevaarth न करता त्यांची बदली L.P.C. मध्ये  Other Treasury  दाखवावी.  असे जर केले नाही तर सदर कर्मचाऱ्यास नविन विभागात रूजु झाल्यानंतर त्याचे वेतन निघत नाही व त्याला बराच कालावधी लागतो.  व हे आपल्या एका छोटयाश्या माहीतीच्या अभावामुळे होते.

जर आपण एखादया कर्मचाऱ्याची सेवा संपवीली End Service in Sevaarth तर काय होईल, तो जेव्हा दुसऱ्या कार्यालयास आपला सेवार्थ आयडी तयार करेल तेव्हा त्यांस आपण यापूर्वीच रजिस्टर आहात असा मेसेज येईल.  त्यामुळे काही काही कर्मचारी त्यांचे नावासमोर एखादा a  लावतात  किंवा काढतात परंतु हे करणे योग्य नाही.  त्यामुळे आपले आजचे काम होत असेल तरी पुढे त्या कर्मचाऱ्यास अडचण निर्माण होते.

जर आपण सेवा समाप्त केली End Service in Sevaarth तर पुढे काय करावे?

1.  जुन्या कार्यालयाने सेवाEnd Service in Sevaarth न संपविता त्यांना Other Treasury LPC  तयार करतांना करावे किंवा तसे न करता सेवा संपविल्यास नविन कार्यालयातुन एक कोषागार कार्यालय व सेवार्थ यांना मेल करावा. ई-मेल आय डी. helpdesk.mum-mh@gov.in  व आपले कोषागार करीता mum चे ठिकाणी आपल्या कोषागार कार्यालयाचे जिल्हाचे ३ अक्षर घ्यावेत. व मेल करतांना आपले कार्यालयाचा युझरआडी व पासवर्ड Assi & DDO यांचा द्यावा व जुन्या कार्यालयाचा सुद्या द्यावा.

2.  जर जुने कार्यालय त्यांचे पासवर्ड देत नसेल तर सेवार्थ यांना मेल करावा व संपर्क साधावा ते सदर कर्मचाऱ्यास आपल्या कार्यालयास जोडून देईल. व त्यांनी पासवर्ड दिला तर सेवार्थ हे जुन्या कार्यालयास सदरचा कर्मचारी यांची सेवा समाप्त End Service in Sevaarth केलेली परत करेल व जुने कार्यालय हे त्याची LPC other Treasury किंवा आपल्या ddo क्रमांकावर पाठविल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *