Statement of GPF Account for year 2021-2022

सन 2021-22 या वर्षाचे भविष्य निर्वाह निधी विवरण पत्र महालेखाकार यांचे नुसार तयार केले असुन त्या नुसार ते जुळत आहे.

आपण तयार केलेल्या  शिट प्रमाणे आपण आपले विवरणपत्र तयार करावे,

या मध्ये सन 2021 मध्ये जो 7 वे वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जमा झाला त्याचे व्याज हे जुलै 2020 पासुन दिले असुन येणारे व्याज व सन 2021-22 या वर्षात 7 वे वेतन आयोगाची दुसऱ्या हप्प्त्याचे थकबाकीची रक्कम यांची बेरीज करुन येणाऱ्या रक्कमेवर सन 2021-22 चे 7.1% दराने व्याज दिले आहे व हे येणारे व्याज व जुलै 2020 ते मार्च 2021 पर्यतचे व्याज एकत्रित करून ते सन 2021-22 मध्ये एकत्रित दर्शविले आहे.

त्यामुळे जमा रक्कमेत वर्गणी व दुसऱ्या हप्त्याची निव्वळ रक्कम घेतली आहे, तसेच व्याजामध्ये जुलै 2020 ते मार्च 2022 पर्यतचे व्याज घेतले आहे.

PURI-GPF-SLIP-2021-22 AS PER AG Final

उदाहरण म्हणुन खालील प्रमाणे पाहू या.

मासिक वर्गणी 12000

दुसरा हप्ता रूपये 37494/-

जुलै 2020 ते मार्च 2021 चे रूपये 37494/- चे व्याज रूपये 1997/- {( 37494*7.1%)/12×9=1997)}

दुसऱ्या हप्त्याची रक्क्म (37494) + जुलै 2020 ते मार्च 2021 चे व्याज रूपये (1997)

सन 2021-22 करीता हप्प्त्याच्या रक्कमेवरील व्याज हप्त्याची रक्कम 37494+व्याज 1997 एकुण 39491 होत असुन यावर 7.1% प्रमाणे 12 महीन्याचे व्याज रूपये 2804/- {(39491*7.1%)=2804}

आता सन 2020-21 मधील व्याज (1997/-) व सन 2021-22 मधील व्याज (2804/-) असे एकुण 4801/- होत असुन ते व वर्गणीच्या रक्कमेवरील व्याज असे एकुण होणारे व्याज हे महालेखाकार यांचेशी जुळत आहे.

तपशिल शेष-1 शेष-2 एकुण रक्कम
आरंभिची शिल्लक ₹ 16,71,859.00 ₹ 0.00 ₹ 16,71,859.00
 
जमा ₹ 1,44,000.00 ₹ 37,494.00 ₹ 1,81,494.00
 
काढलेली रक्कम (-) ₹ 0.00 ₹ 0.00 ₹ 0.00
     
व्याज ₹ 1,24,240.00 ₹ 4,801.00 ₹ 1,29,041.00
       
31 मार्च 2022
अखेरची शिल्लक
₹ 19,40,099.00 ₹ 42,295.00 ₹ 19,82,394.00

PURI-GPF-SLIP-2021-22 AS PER AG Final

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *