How to Prepare a Medical Reimbursement Bill on the Bill Portal
🏛️ महाकोष पोर्टलवर मेडिकल बिल सादर करण्याची पद्धत
सर्वप्रथम महाकोष (MahaKosh) प्रणाली उघडून बिल असिस्टंट (Bill Assistant) च्या लॉगिनने प्रवेश (Log in) करावा.
𝙎𝙝𝙖𝙨𝙠𝙞𝙮𝙖 𝙆𝙖𝙧𝙢𝙖𝙘𝙝𝙖𝙧𝙞 𝙎𝙚𝙫𝙖𝙖𝙧𝙩𝙝 | 𝘼𝙣 𝙞𝙣𝙞𝙩𝙞𝙖𝙩𝙞𝙫𝙚 𝙗𝙮 𝙋𝙧𝙖𝙢𝙤𝙙 𝙋𝙪𝙧𝙞
How to Prepare a Medical Reimbursement Bill on the Bill Portal
सर्वप्रथम महाकोष (MahaKosh) प्रणाली उघडून बिल असिस्टंट (Bill Assistant) च्या लॉगिनने प्रवेश (Log in) करावा.
१. डिपेंडंट माहिती भरणे (Family Dependent Master):Assist Login.
Master मेनूवर क्लिक करा ➔ Family Dependent Master Details निवडा ➔ कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील अवलंबून असणाऱ्या (Dependent) व्यक्तींची सर्व आवश्यक माहिती भरून सेव्ह करा.
२. मेडिकल क्लेम नोंदवणे (Medical Claim Entry):Assist Login.
Assistance मेनूवर जा ➔ Medical Claim Entry निवडा ➔ New Medical Claim वर क्लिक करून सर्व आवश्यक तपशील आणि टॅब भरा.
३. क्लेम सबमिट करणे:Assist Login.
भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा आणि Submit बटणावर क्लिक करा. त्यानंतर असिस्टंट लॉगिन लॉग आउट करा.
४. क्लेम तपासणे (Medical Claim Check):Final / DDO Login.
आता अंतिम लॉगिन (Final / DDO Login) उघडा ➔ Assistance मध्ये जाऊन Medical हा पर्याय निवडा. तुम्ही असिस्टंट लॉगिनवरून भरलेली सर्व माहिती येथे दिसेल.
५. बिल मंजूर करणे (Bill Approval):Final / DDO Login.
दाखल केलेल्या माहितीची व कागदपत्रांची पडताळणी करा आणि Bill Approve करा. त्यानंतर अंतिम लॉगिन लॉग आउट करा.
६. बिल निर्मिती सुरू करणे (Bill Preparation):Assist Login.
पुन्हा बिल असिस्टंटच्या (Assist) लॉगिनमध्ये जा ➔ Assistance मेनूमध्ये जाऊन Bill Preparation वर क्लिक करा.
७. नोंदणी क्रमांक व महिना निवडणे:Assist Login.
Bill Registration No. मध्ये 0 टाका आणि चालू महिना (Current Month) निवडा.
८. पे तपशील व रक्कम भरणे (Pay Details):Assist Login.
सर्व आवश्यक तपशील आणि मंजूर झालेली रक्कम प्रविष्ट करा. रक्कमेचे वाटप थेट कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने Other पर्यायामध्ये जाऊन कर्मचाऱ्याचे Pay Details भरा.
९. बीडीएस मसुदा तयार करणे (BDS Draft):Assist Login.
सर्व तपशील भरून सबमिट केल्यावर प्रणालीद्वारे BDS Draft तयार होईल.
१०. बीडीएस फायनल व प्रिंट काढणे (BDS Final & Print):Final / DDO Login.
पुन्हा अंतिम लॉगिन (Final Login) मध्ये जा ➔ BDS Final करा. बिलाची फायनल प्रिंटआउट (Print) काढून आवश्यक त्या सर्व जोडपत्रांसह बिल कोषागारात (Treasury) सादर करा.